महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / city

'विरोधकांचा आवाज दाबण्यासाठी भाजप ईडीचा वापर करते' - विरोधकांविरोधात ईडीचा वापर

खडसेंना ईडीची नोटीस बजावण्याची शक्यता त्यांनी राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश केला तेव्हापासूनच वर्तविली जात होती, असे मत छगन भुजबळ यांनी व्यक्त केले आहे.

chhagan bhujbal
अन्नपुरवठा मंत्री छगन भुजबळ

By

Published : Dec 26, 2020, 1:02 PM IST

नाशिक- ईडीचा उपयोग आपल्या विरोधकांचा आवाज दाबण्यासाठी केला जातोय. जो सरकार विरोधात बोलेल त्याला त्रास देण्याचा प्रयत्न होतो. राष्ट्रवादीत प्रवेश केला तेव्हाच खडसेंना नोटीस मिळेल, अशी शक्यता वर्तवली जात होती. एकनाथ खडसे यांना ईडीची नोटीस आल्याच्या बातम्या प्रसारीत झाल्यानंतर अन्नपुरवठा मंत्री भुजबळ यांनी त्यावर प्रतिक्रिया दिली आहे.

एकत्र लढले तर भाजपाला रोखणे शक्य....

काही दिवसांपूर्वीच भाजप मधून राष्ट्रवादी मध्ये प्रवेश केलेल्या ज्येष्ठ नेते एकनाथ खडसे यांना शुक्रवारी सायंकाळी नोटीस बजावली असल्याची माहिती समोर येत आहे. या प्रकारे ईडीचा उपयोग विरोधकांचा आवाज दाबण्यासाठी केला जातो, जो सरकारच्या विरोधात बोलले, त्यांना ईडीच्या माध्यमातून त्रास देण्याचा प्रयत्न केला जात असल्याचा आरोप करत भुजबळ यांनी केंद्र सरकार आणि भाजपवर निशाणा साधला आहे.

अन्नपुरवठा मंत्री भुजबळ

देशभरात भाजप विरुध्द यूपीए आणि बाहेरचे पक्ष एकत्र आले तरच आजची परिस्थिती सुधारेल, ही वस्तुस्थिती आहे. एकत्र लढले तरच भाजपाला रोखणे शक्य आहे. ज्या राज्यात विरोधी पक्ष आहे. त्यांना पाठिंबा दिल्यास परिस्थितीत बदल होईल, असेही मत भुजबळ यांनी यावेळी व्यक्त केले.

पीकविमा कंपन्या स्वतःचा फायदा बघतात-

राज्यात पीकविमा कंपन्यांबद्दल अनेक तक्रारी आहेत. या कंपन्या स्वतःचा फायदा बघत असल्याची आरोप त्यांनी केला. टोल नाक्यावर ज्यावेळी रांगा लागतात, त्यावेळी कठीण परिस्थिती होते. टोल धारकांनी लोकांशी सहानुभूतीने वागावे. रांगेत राहिले तर लोकांची सुट्टी रांगेतच जाईल, मनात आणले तर बदल होऊ शकतात असेही त्यांनी टोल कंपन्याना बजावले.

यावेळी बोलताना भुजबळ यांनी भाजपा प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांच्यावरही निशाणा साधला आहे. चंद्रकांत पाटील यांनी कोल्हापुरात जावे, घरी जावे, कुठेही जावे तो त्यांचा विषय, असल्याचे म्हणत त्यांना चंद्रकांत पाटलांच्या कोल्हापूर परतनाच्या वक्तव्यावर टोला लगावला.



ABOUT THE AUTHOR

...view details