नाशिक -नाशिक शहरात गेल्या काही महिन्यांपासून मुलींचा जन्मदर कमी झाला आहे. याची आता महापालिकेच्या वैद्यकीय विभागाने गंभीर दखल घेत गर्भधारणा पूर्व व प्रसवपूर्व लिंग निदान तंत्र कायद्याची काटेकोर (Female Birth Declining In Nashik) अंमलबजावणी करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. नाशिक शहरातील 344 सोनोग्राफी केंद्राची तपासणी करण्यात येणार असून यासाठी 30 पथके तैनात करण्यात आली आहेत.
आता शहरातील 344 सोनोग्राफी केंद्राची 30 पथकांमार्फत तपासणी करण्यात येणार
नाशिक महानगरपालिका (Nashik Municipal Corporation) क्षेत्रात काही वर्षांपूर्वी मोठ्या प्रमाणत स्त्रीभ्रूण हत्या होत असल्याचे प्रकार समोर आले होते. यासोबत आता बेकायदेशीररित्या गर्भधारणापूर्व व प्रसवपूर्व लिंग निदान होत असल्याच्या तक्रारी वाढत आहेत. त्या पार्श्वभूमीवर महानगरपालिकेच्या वैद्यकीय विभागाने याची गंभीर दखल घेतली आहे. (India fertility rate drops below ) आता शहरातील 344 सोनोग्राफी केंद्राची 30 पथकांमार्फत तपासणी करण्यात येणार आहे. त्याचा तपासणी अहवाल 15 जानेवारीपर्यंत सादर करण्याचे आदेश वैद्यकीय अधीक्षक डॉ. बापूसाहेब नागरगोजे यांनी पथकांना दिले आहेत.
आता पर्यंत 12 सोनोग्राफी सील
नाशिक शहरात 344 सोनोग्राफी केंद्राची नोंदी असल्यातरी त्यापैकी 322 सोनोग्राफी केंद्र प्रत्यक्षात सुरू आहेत. यातील 10 केंद्र तात्पुरते बंद आहेत. तर, 12 सोनोग्राफी केंद्रात लिंग निदान होत (Women Empowerment in India) असल्याच्या तक्रारीवरून सील करण्यात आली आहेत. कायद्यातील तरतुदीनुसार महानगरपालिका हद्दीतील सोनोग्राफी केंद्राची त्रेमासिक तपासणी करणे बंधनकारक आहे. मात्र, मध्यंतरीच्या कोरोनामुळे अशी तपासणी करण्यात खंड पडला होता. त्यामुळे आता पुन्हा एकदा नाशिक महानगरपालिकेच्या वैद्यकीय विभागाने पथके नेमून सर्व सोनोग्राफी केंद्राची तपासणी केली जाणार आहे.
स्त्री-पुरुष समानतेमध्ये भारताचे स्थान काय आहे ?
महिला सक्षमीकरणाच्या कितीही टिमक्या केंद्र सरकार वाजवत असले, तरी भारतातील स्त्री-पुरुष समानता दर दिवसेंदिवस कमी होत चालल्याचे समोर येत आहे. जागतिक आर्थिक मंचाने जाहीर केलेली नवीन आकडेवारी पाहता, आपण खरंच देशातील महिलांसाठी काही करतोय का असा प्रश्न उपस्थित होतो.
१५६ देशांच्या यादीत भारताचा क्रमांक हा १४०वा