नाशिक मेट्रोमुळे सार्वजनिक वाहतूक व्यवस्थेला बळ मिळणार - खासदार गोडसे
निओ मेट्रोला मंजुरी मिळाल्याने नाशिककर मात्र सुखावले आहेत. या प्रकल्पामुळे शहरातील सार्वजनिक वाहतुकीला बळकटी मिळणार आहे. निओ मेट्रो हा देशातील पहिला प्रकल्प असून प्रदूषण विरहित टायर-बेस मेट्रो प्रोजेक्ट असणार असल्याचेही गोडसे म्हणाले.
नाशिक- केंद्रीय अर्थसंकल्पात नाशिक मेट्रोसाठी 2 हजार 090 कोटींची तरतूद करण्यात आली आहे. त्यामुळे नाशिककरांमध्ये आनंदाचे वातावरण दिसून येत आहे. निओ मेट्रोमुळे सार्वजनिक वाहतूक व्यवस्थेला बळ मिळणार असल्याची प्रतिक्रिया शिवसेना खासदार हेमंत गोडसे यांनी दिली आहे आहे.
केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामण यांनी सोमवारी देशाचा अर्थसंकल्प सादर केला. या अर्थसंकल्पात नाशिकच्या मेट्रोची घोषणा करण्यात आली. यासाठी 2 हजार 090 कोटी रुपयांची तरदूत केली आहे. निओ मेट्रोला मंजुरी मिळाल्याने नाशिककर मात्र सुखावले आहेत. या प्रकल्पामुळे शहरातील सार्वजनिक वाहतुकीला बळकटी मिळणार आहे. निओ मेट्रो हा देशातील पहिला प्रकल्प असून प्रदूषण विरहित टायर-बेस मेट्रो प्रोजेक्ट असणार असल्याचेही गोडसे म्हणाले.
- देशातील पहिला एलिव्हेटेड टायर-बेस मेट्रो प्रकल्प
- 25 लांबीच्या 250 प्रवासी क्षमतेच्या जोड बस
- एकूण 31.40 किलोमीटर लांबीचे एलिव्हेटेड
- पहिल्या कॉरिडॉर वर 19 स्टेशन
- गंगापूर ते नाशिक रोड 22 किलोमीटरचा पहिला कॉरिडॉर
- गंगापूर ते मुंबई नाका 10 किलोमीटर चा दुसरा कॉरिडॉर