महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / city

94 व्या साहित्य संमेलनाच्या गीतात स्वातंत्र्यवीर सावरकरांचा उल्लेख नसल्याने मनसे आक्रमक

94 व्या साहित्य संमेलनाच्या संमेलन गीताचे पालकमंत्री भुजबळाच्या (Chhagan Bhujbal) हस्ते उद्घाटन झाले. पण त्यात स्वातंत्र्यवीर सावरकरांचा उल्लेख नसल्याने मनसे नाराज झाली आहे. मनसे कार्यालात सावरकरांच्या प्रतिमेला पुष्पहार घालून पदाधिकाऱ्यांनी घोषणाबाजी केली. स्वातंत्र्यवीर सावरकर नाशिकचे भूमीपुत्र असून त्यांच्या नावाचा उल्लेख असलाच पाहिजे, हा मुद्दा मनसेने उपस्थित केला.

मनसे
मनसे

By

Published : Nov 10, 2021, 4:13 PM IST

Updated : Nov 10, 2021, 4:50 PM IST

नाशिक -नाशिकमध्ये 94 वे अखिल भारतीय साहित्य संमेलन (Akhil Bharatiya Marathi Sahitya Sammela) होत असून संमेलनाच्या गीतात स्वातंत्र्यवीर (Vinayak Damodar Savarkar) सावरकरांचा उल्लेख नसल्याने मनसे (MNS) आक्रमक झाली आहे. मनसे शहराध्यक्ष दिलीप दातीर यांनी प्रायश्चित्त म्हणून संमेलन नगरीला स्वातंत्र्यवीर सावरकरांचा नाव देण्याची मागणी पालकमंत्री भुजबळांकडे केली आहे.

संमेलनाच्या गीतात स्वातंत्र्यवीर सावरकरांचा उल्लेख नसल्याने मनसे आक्रमक

'संमेलन नगरीला सावरकरांचे नाव द्या'

94 व्या साहित्य संमेलनाच्या संमेलन गीताचे पालकमंत्री भुजबळाच्या (Chhagan Bhujbal) हस्ते उद्घाटन झाले. पण त्यात स्वातंत्र्यवीर सावरकरांचा उल्लेख नसल्याने मनसे नाराज झाली आहे. मनसे कार्यालात सावरकरांच्या प्रतिमेला पुष्पहार घालून पदाधिकाऱ्यांनी घोषणाबाजी केली. स्वातंत्र्यवीर सावरकर नाशिकचे भूमीपुत्र असून त्यांच्या नावाचा उल्लेख असलाच पाहिजे, हा मुद्दा मनसेने उपस्थित केला असून स्वागताध्यक्ष छगन भुजबळ यांना भेटणार असल्याची माहिती मनसे शहराध्यक्ष दिलीप दातीर यांनी दिली आहे. शिवाय या बाबीचा मनसेने निषेधही नोंदवला आहे.

पदाधिकाऱ्यांनी केली घोषणाबाजी

1938 साली मुंबई येथे झालेल्या 23 व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाचे अध्यक्ष असणारे स्वातंत्र्यवीर सावरकर हे नाशिकचे भूमिपुत्र असून त्यांचे स्वातंत्र्य लढ्यातील आणि मराठी साहित्यातील योगदान अमूल्य आहे. तरीसुद्धा साहित्य संमेलनाचा ज्या गीतामध्ये अनेकांचे उल्लेख आठवणीने केले असतानाही क्रांती आणि साहित्याचे अग्रदूत असणार्‍या स्वातंत्र्यवीर सावरकरांना उल्लेख टाळून आयोजकांनी नाशिककर तसेच प्रत्येक राष्ट्रभक्त नागरिकांचाच अपमानच केला आहे, अशी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेची भूमिका आहे. आयोजकांनी ही चूक त्वरित सुधारावी तसेच साहित्य संमेलनाच्या नगरीला स्वातंत्र्यवीर सावरकरांचे नाव देऊन स्वातंत्र्यवीरांचा यथोचित सन्मान करावा, अशी मागणी मनसेनी केली आहे. स्वातंत्र्यवीर सावरकरांच्या अपमानाचा निषेध प्रत्येक राजकीय पक्षाने करणे अपेक्षित आहे. हा राजकीय विषय नसून साहित्यिक आणि राष्ट्रभक्तांच्या अस्मितेचा विषय आहे. बदललेल्या राजकीय परिस्थिती आणि भूमिकांमुळे राजकीय पक्षांची बोटचेपी भूमिका यामुळे लोकांसमोर येत आहे. परंतु महाराष्ट्र नवनिर्माण सेनेची स्पष्ट भूमिका आहे, की नाशिकचे भूमिपुत्र असणार्‍या स्वातंत्र्यवीरांचा हा अपमान मनसेना कधीही सहन करणार नाही. आपले आदर्श आणि अस्मिता यांच्याशी महाराष्ट्र नवनिर्माण सेना कधीही तडजोड करणार नाही, असे म्हटले आहे. शिवाय यावेळी पदाधिऱ्यांनी जोरदार घोषणाबाजी केली.

हेही वाचा -राज्य सरकारने आता तरी जागे व्हा- प्रविण दरेकर

Last Updated : Nov 10, 2021, 4:50 PM IST

ABOUT THE AUTHOR

...view details