महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / city

सार्वजनिक शौचालयात अल्पवयीन मुलीवर अतिप्रसंग; आरोपी ताब्यात - crime in nashik

मुख्य शहरातील जेलरोड परिसरात कॅनॉल रस्ता येथे अल्पवयीन मुलीवर सार्वजनिक शौचालयात अतिप्रसंग केल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. इंदिरानगर झोपडपट्टीत ही घटना घडली असून संबंधित आरोपी पीडितेला याआधी देखील त्रास देत असल्याचे स्पष्ट झाले आहे.

physical abuse in nashik
सार्वजनिक शौचालयात अल्पवयीन मुलीवर अतिप्रसंग; आरोपी ताब्यात

By

Published : May 30, 2020, 8:06 PM IST

नाशिक -मुख्य शहरातील जेलरोड परिसरात कॅनॉल रस्ता येथे अल्पवयीन मुलीवर सार्वजनिक शौचालयात अतिप्रसंग केल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. इंदिरानगर झोपडपट्टीत ही घटना घडली असून संबंधित आरोपी पीडितेला याआधी देखील त्रास देत असल्याचे स्पष्ट झाले आहे. मैत्री करण्याच्या बहाण्याने त्यांने पीडितेवर अतिप्रसंग केला असून उपनगर पोलिसांनी त्याला अटक केली आहे. आरोपीविरुद्ध बलात्काराचा गुन्हा दाखल करण्यात आलाय.

सार्वजनिक शौचालयात अल्पवयीन मुलीवर अतिप्रसंग; आरोपी ताब्यात
नाशिकरोड भागातील जेलरोड परिसरात आरोपी अनिल शर्मा (वय २१) वास्तव्यास आहे. तो मूळचा मध्य प्रदेशातील आहे. मैत्री करण्याच्या बहाण्याने तो पीडितेला त्रास देत होता. 27 मे रोजी त्याने पीडित मुलीला फोन केला. यानंतर मुलीने फोन उचलून बाथरूमला जात असल्याचे सांगितले. यानंतर मुलगी सार्वजनिक शौचालयात पोहोचल्यानंतर त्या ठिकाणी आरोपी आला; आणि त्याने पीडितेवर अतिप्रसंग केला.संबंधित प्रकरणाबाबत पीडित मुलीने दिलेल्या फिर्यादीवरून आरोपी विरोधात उपनगर पोलीस ठाण्यात पोक्सो कायद्यांतर्गत बलात्काराचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

ABOUT THE AUTHOR

...view details