महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / city

'उत्तर महाराष्ट्रासह मराठवाड्याला पाणी मिळण्यासाठी मोठ्या प्रकल्पांचे नियोजन' - नाशिक मंत्री छगन भुजबळ बातमी

नाशिक जिल्ह्यातील प्रकल्पांच्या सर्वेक्षण व मान्यतांचा महिन्यातून एकदा आढावा मंत्रालय स्तरावर घेण्यात येतो. लवकरात लवकर हे प्रकल्प पूर्ण करण्यासाठी अर्थिक तरतूद करण्याबरोबरच शिल्लक कामांसाठी सामित्व मंजूर करणे तसेच नाशिक, अहमदनगर जिल्ह्यातील वळण बंधाऱ्यांच्या व लिफ्टच्या कामात शासनाने विशेष लक्ष केंद्रीत केले आहे, असे जयंत पाटील यावेळी म्हणाले.

minister jayant patil on north maharashtra and marathwada water project at nashik
उत्तर महाराष्ट्रासह मराठवाड्याला पाणी मिळण्यासाठी मोठ्या प्रकल्पांचे नियोजन

By

Published : Sep 22, 2020, 7:52 PM IST

नाशिक : नाशिक व अहमदनगर जिल्ह्यातील जलसंपदा विभागाच्या अंतर्गत येणाऱ्या उत्तर महाराष्ट्र प्रदेश गोदावरी मराठवाडा पाटबंधारे विकास महामंडळ व लाभक्षेत्र विकास प्राधिकरणाच्या पश्चिमवाहिनी नद्यांचे पाणी पुर्वेकडे गोदावरी खोऱ्यात वळविण्याच्या कामासंबंधातील मुलभूत बाबिंची चर्चा करण्याच्या हेतुने आज जलसंपदा विभागाच्या प्रकल्पांचा आढावा घेतला. उत्तर महाराष्ट्रासह मराठवाड्याला पाणी मिळण्यासाठी मोठ्या प्रकल्पांचे शाश्वत, परिणामकारक नियोजन करण्यात यावे. जिल्ह्यातील छोट्या प्रकल्पांना गती देण्यासाठी कालबद्ध कार्यक्रमाची आखणी करण्याच्या सूचना जलसंपदा मंत्री जयंत पाटील यांनी दिल्या आहेत.

उत्तर महाराष्ट्रासह मराठवाड्याला पाणी मिळण्यासाठी मोठ्या प्रकल्पांचे नियोजन

जिल्हाधिकारी कार्यालयातील नियोजन सभागृहात आज जलसंपदा विभागाच्या आढावा बैठकीत ते बोलत होते. यावेळी ते म्हणाले, की महाविकास आघाडीचे सरकार स्थापन झाल्यापासून नाशिक जिल्ह्यातील प्रकल्पांच्या सर्वेक्षण व मान्यतांचा महिन्यातून एकदा आढावा मंत्रालय स्तरावर घेण्यात येतो. लवकरात लवकर हे प्रकल्प पूर्ण करण्यासाठी अर्थिक तरतूद करण्याबरोबरच शिल्लक कामांसाठी सामित्व मंजूर करणे तसेच नाशिक, अहमदनगर जिल्ह्यातील वळण बंधाऱ्यांच्या व लिफ्टच्या कामात शासनाने विशेष लक्ष केंद्रीत केले आहे. यामुळे तातडीने ही कामे पूर्ण करण्याचा प्रयत्न आहे. गोदावरी खोऱ्यातील प्रकल्पांचे पाणी नाशिक, नगरसह जायकवाडीपर्यंत मुबलक तसेच सातत्यपूर्ण प्रवाहात राहण्यासाठी शासन प्रयत्नशील आहे.

जिथे शक्य आहे तिथे पाणी वळवण्यसाठीच्या शक्यता तपासून त्याप्रमाणे आखणी करण्यात येईल. लहान व पटकन पूर्ण होणारे प्रकल्प तात्काळ पूर्णत्वासाठी नेले जातील, त्यासाठी निधीची तरतूदही केली जाईल. मोठ्या प्रकल्पांसाठी प्रसंगी कर्जही काढण्याचे नियोजन केले जाईल. आमदारांच्या मतदारसंघातील चाऱ्यांची कामे तसेच कॅनॉलच्या देखभाल व दुरूस्तीची कामे त्यांच्यासोबत बसून चर्चेतून अधिकाऱ्यांनी पूर्ण करावेत. त्यासाठी १० टक्के निधीची तरतूदही करण्यात आली असल्याचे सांगून पुढील काही दिवसात दिंडोरी व कळवण मतदार संघातील प्रकल्पांच्या कामासाठी प्रत्यक्ष प्रकल्पांना भेट देणार असल्याचेही जलसंपदा मंत्री पाटील यांनी यावेळी सांगितले.

पाण्याच्या गरजेप्रमाणे योजनांना प्राधान्य द्यावे - छगंन भुजबळ

जिल्ह्यातील प्रत्येक तालुक्याची तहाण भागेल यासाठी प्राधान्य ठरवून प्रकल्पांची कामे हाती घेण्यात यावीत. सिन्नरला पिण्याच्या पाण्याचाच मुलभूत प्रश्न आहे. त्यासाठी नियोजित योजनांची कामे सहा महिन्यांच्या आत सुरू करण्याचा प्रयत्न करावा. महाराष्ट्राच्या जमीनीवर पडणारे पाणी महाराष्ट्राला मिळाले पाहिजे. त्याचा हक्क आम्ही सोडणार नाही अथवा लिहून देणार नाही. राज्याच्या हक्काचं पाणी राज्यातच राहायला हवे. आमदारांनी सुचवलेल्या छोट्या प्रकल्पांची कामेही तात्काळ पूर्णत्वास नेण्यासाठी कालबद्ध कार्यक्रम आखावा व अपूर्ण कामे तातडीने पूर्ण करण्याच्या सूचना यावेळी पालकमंत्री भुजबळ यांनी दिल्या आहेत.

ABOUT THE AUTHOR

...view details