नाशिक - सोशल मीडियावरून महिलांना लग्नाचे आमिष दाखवत नंतर त्यांचे आर्थिक लैंगिक शोषण करणाऱ्या अटल गुन्हेगारास नाशिकच्या इंदिरानगर पोलिसांनी दोन महिन्यांच्या प्रयत्नानंतर अटक केली आहे. तसेच एका मुलीची सुटका केली.
सोशल मीडियावरून करत होता मुलींशी ओळख-
नाशिक - सोशल मीडियावरून महिलांना लग्नाचे आमिष दाखवत नंतर त्यांचे आर्थिक लैंगिक शोषण करणाऱ्या अटल गुन्हेगारास नाशिकच्या इंदिरानगर पोलिसांनी दोन महिन्यांच्या प्रयत्नानंतर अटक केली आहे. तसेच एका मुलीची सुटका केली.
सोशल मीडियावरून करत होता मुलींशी ओळख-
नाशिकच्या इंदिरानगर पोलीस ठाण्यात डिसेंबर 2020 मध्ये 20 वर्षीय मुलगी मिसिंग झाल्याची तक्रार दाखल झाली होती. तापसामध्ये मुलगी सोशल मीडियाद्वारे ओळख झालेल्या मुलाबरोबर गेल्याच समोर आलं होतं. पोलीस तपासात संशयित वैभव पाटील (रा मराळी,सातारा) या व्यक्तीबरोबर मुलगी पळून गेल्याच समोर आल्यानंतर पोलिसांनी सातारा पोलिसांशी संपर्क साधला असता धक्कादायक बाब समोर आली. याआधी देखील संशयित वैभव पाटील याच्याविरोधात सातारा आणि ठाणे पोलिसात बलात्काराचे गुन्हे दाखल आहेत. वैभव हा सोशल मीडियावरून मुलींशी ओळख करत होता. त्यानंतर त्यांना प्रेमाच्या जाळ्यात ओढून लग्नाचे आमिष दाखवत होता. तसेच मुलींना घरातून बाहेर पडण्यास भाग पाडत होता आणि नंतर त्यांचे आर्थिक, शारिरीक शोषण करून माझे आधीच लग्न झाले आहे, असे सांगून त्यांना घरी जाण्यास भाग पाडत असे. काही मुली देखील आपली बदनामी होऊ नये म्हणून घरी परतत असत, अशी माहिती समोर आली आहे.
पोलीस मागील दोन महिन्यांपासून होते मागावर-
संशयित वैभव पाटील याच्या शोधार्थ ठाणे, मुरबाड, सातारा, महाड आणि नाशिक पोलीस मागील दोन महिन्यांपासून मागावर होते. गुप्त माहितीवरून मिसिंग मुलीच्या वडिलांनी पोलिसांना घेऊन मुरबाड येथून संशयित वैभव यास मुलीसह ताब्यात घेतले. त्याच्याविरोधात भारतीय दंड विधान नुसार लैंगिक शोषण, मानसिक अत्याचार, मारहाण आदी गुन्हे दाखल करण्यात आले आहेत.
हेही वाचा-महाराष्ट्रात कोरोना रुग्णसंख्येचा आलेख चढता; विदर्भामध्ये स्थिती चिंताजनक