महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / city

तुमचा निषेध म्हणत..मालेगावच्या महापौरांनी सोडली पत्रकार परिषद; खासदार भामरेंच्या अचानक आगमनाने संतप्त

कोरोना काळात मालेगाव शहराचे रुग्ण धुळ्यात नको, असे धुळ्याचे खासदार सुभाष भामरे यांनी म्हटले होते. त्यांनी आज अचानकपणे मालेगावला भेट दिली. यावेळी त्यांनी मालेगाव शासकीय विश्रामगृहावर महापालिकेच्या पत्रकार परिषदेत हजेरी लावल्यानंतर महापौर ताहेरा शेख आणि माजी आमदार रशीद शेख यांनी खासदार भामरे यांचा निषेध केला आणि पत्रकार परिषदेतून काढता पाय घेतला.

Dhule MP Subhash Bhamre Malegaon Mayor Tahera Sheikh
मालेगाव महापौर ताहेरा शेख विरुद्ध धुळे खासदार सुभाष भामरे

By

Published : Jun 12, 2020, 6:49 PM IST

मालेगाव (नाशिक) : मालेगाव शहरातील कोरोनाबाधित रुग्ण धुळ्यात नको, असे वादग्रस्त विधान करणारे धुळ्याचे खासदार गुरुवारी अचानक मालेगावमध्ये दाखल झाले. यावेळी त्यांनी शासकीय विश्रामगृहावर महापालिकेच्या पत्रकार परिषदेत अचानकपणे हजेरी लावली. त्यामुळे मालेगावच्या महापौर ताहेरा शेख आणि माजी आमदार रशीद शेख यांनी त्यांचा निषेध केल्याने काही काळ विश्रामगृह परिसरात तणावाचे वातावरण निर्माण झाले होते.

कोरोना काळात मालेगाव शहराचे रुग्ण धुळ्यात नको, असे धुळ्याचे खासदार सुभाष भामरे यांनी म्हटले होते. त्यांनी आज अचानकपणे मालेगावला भेट दिली. यावेळी त्यांनी मालेगाव शासकीय विश्रामगृहावर महापालिकेच्या पत्रकार परिषदेत हजेरी लावल्यानंतर महापौर ताहेरा शेख आणि माजी आमदार रशीद शेख यांनी खासदार भामरे यांचा निषेध केला आणि पत्रकार परिषदेतून काढता पाय घेतला.

खासदार सुभाष भामरेंच्या अचानक आगमनाने संतप्त.. मालेगावच्या महापौरांनी सोडली पत्रकार परिषद

हेही वाचा...माझ्या वाढदिवसाला शुभेच्छा द्यायला येऊ नका, राज ठाकरेंचे कार्यकर्त्यांना आवाहन

'ज्यावेळी जगभरात संपूर्ण देश एकमेकांची मदत करत होता. त्यावेळी खासदार भामरे यांनी मालेगाव मधील रुग्ण धुळ्यात नको, असे विधान केले होते. त्यामुळे आपण त्यांचा निषेध केला आहे. तसेच त्यांच्या सोबत पत्रकार परिषदेत देखील सहभागी झालो नाही' अशी माहिती मालेगावच्या महापौर ताहेरा शेख यांनी दिली.

यावर प्रतिउत्तर देताना खासदार सुभाष भामरे यांनी, 'आपण आयसीएमआरआणि फायनान्स कमिटीवर कार्यरत असून मालेगावमध्ये कोरोनाच्या पार्श्वभूमीवर नवीन रुग्णालय उभारता येईल की नाही. याची पाहणी करण्यासाठी आलो होतो.' असे सांगितले.

दरम्यान, मालेगाव मध्य व मालेगाव बाह्य हे दोन्हीही विधानभा क्षेत्र खासदार सुभाष भामरे यांच्या मतदार संघात येतात.परंतु, मालेगाव शहरात कोरोनाचा प्रार्दुभाव वाढत असताना मालेगाव येथील रुग्ण उपचारासाठी धुळ्याला आणू नये, असे वक्तव्य त्यांनी केले होते. त्यावरून बराच वादंग निर्माण झाला होता. मात्र, आज (शुक्रवार) खासदार सुभाष भामरे यांनी अचानक मालेगावला भेट दिली. त्यानंतर महापौर ताहेरा शेख आणि माजी आमदार रशीद शेख यांनी त्यांचा निषेध म्हणून पत्रकार परिषद सोडल्याने विश्रामगृह परिसरात काही काळ तणावाचे वातावरण निर्माण झाले होते.

ABOUT THE AUTHOR

...view details