नाशिक - उत्तरप्रदेशच्या घटनेमुळे महाराष्ट्र बंद हा राजकीय हेतूने घेतलेला निर्णय आहे. व्यापारी कोरोनामुळे आधीच त्रस्त झाले आहेत, अशावेळी महाराष्ट्र बंदच्या राजकीय हाकेला कोणी साथ देणार नाही, असा विश्वास नाशिक दौऱ्यावर आलेल्या भाजपाचे ज्येष्ठ नेते, माजी मंत्री गिरीश महाजन यांनी पत्रकार परिषदेत केला आहे.
राज्यातील शेतकऱ्यावर अन्याय होत आहे, हे दुर्दैव -
ओबीसी जागर अभियान संदर्भात एन.डी. पटेल रोडवरील वसंत स्मृती कार्यालयात आयोजीत बैठकीनंतर ते पत्रकारांशी बोलत होते. ते म्हणाले की, शरद पवार ज्येष्ठ नेते असूनही राज्यातील शेतकऱ्यांवर अन्याय होत आहे, हे दुर्दैव आहे. महाराष्ट्रात अतिवृष्टीमुळे बळीराजा संकटात अजून सरकारने कोणालाही एक दमडीचीही मदत केली नसल्याने शेतकरी अडचणीत सापडला आहेत. राज्यातील अनेक सहकारी बँका डबघाईला आलेल्या आहेत. जळगाव जिल्हा बँकेत शेतकऱ्यांसाठी मी आणि नाथाभाऊ एकत्र आलो आहेत. सर्व पक्षांना बरोबर घेऊन बँक निवडणुक बिनविरोध करण्यासाठी प्रयत्न सुरु असल्याचे महाजन यांनी सांगितले आहे.
आयकर विभागाकडून सत्यता समोर येईल -
शरद पवार उत्तर प्रदेशच्या घटनेबद्दल बोलले आणि त्यानंतर लगेच अजित पवार यांच्या नातेवाईकाची आयकर विभागाने धाडी पडल्या या आरोपांचे महाजन यांनी खंडन केले आहेत. अजित पवार स्वतः म्हटले आहेत की पाहुणे जाऊ द्या नंतर बोलू. यासंदर्भात जे काही सत्य असेल ते समोर येणार आहेत.