महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / city

२४७ वर्षाची परंपरा असलेल्या 'राम'सह गरुडरथाची भव्य मिरवणूक, दुमदुमले रामनाम - काळाराम मंदिर

पेशवेकाळापासून म्हणजे १७७२ सालापासून नाशिकमध्ये काळाराम मंदिराच्या रथ उत्सवाची परंपरा आहे.  दरवर्षीप्रमाणे नाशिकमधील अनेक भाविक यात मोठ्या उत्साहाने सहभागी झाले.

गरुडरथाची भव्य मिरवणूक

By

Published : Apr 16, 2019, 8:15 PM IST

नाशिक- नाशिकचे ग्रामदैवत म्हणून श्री काळाराम मंदिराची ओळख आहे. या मंदिराच्या राम आणि गरुड रथाला 247 वर्षाची परंपरा आहे. चैत्र शुल्क एकादशीला निघणाऱ्या श्रीराम आणि गरुड रथाच्या यात्रेने आज नाशिक परिसर दुमदुमून गेला.

पेशवेकाळापासून म्हणजे १७७२ सालापासून नाशिकमध्ये काळाराम मंदिराच्या रथ उत्सवाची परंपरा आहे. दरवर्षीप्रमाणे नाशिकमधील अनेक भाविक यात मोठ्या उत्साहाने सहभागी झाले.

गरुडरथाची भव्य मिरवणूक
काय आहे रथाचा यात्रेचा इतिहास-श्रीमंत गोपिकाबाई पेशवे सवाई माधवराव पेशवे यांनी आरोग्यप्राप्ती साठी नवस केला होता. नवस पूर्ण करण्यासाठी पेशवे यांनी श्रीरामाला राम रथ अर्पण केला होता. या रथाची देखभालाची जबाबदारी श्रीमंत सरदार रास्ते यांच्याकडे दिला होती. तेव्हाापासून रथाची परंपरा सुरू असल्याचे काळाराम मंदिराचे विश्वस्त पांडुरंग बोडके यांनी सांगितले.

असा आहे रथ-
श्रीरामाचा हा रथ पूर्णपणे सागवानापासून तयार करण्यात आला आहे. रथाच्या पुढच्या बाजूने लांब दोरी असते तशीच मागील बाजूनेदेखील जाड दोरी असते.


अशी आहे रथयात्रा आणि रथ -
या रथात भगवान श्रीरामच्या पादुका विराजमान होत असतात. या पादुका गरुड रथामधून नाशिकमधील भाविकांच्या दर्शनासाठी जात असतात. गरुड रथ हा गोदावरी नदी ओलांडून मध्य नाशिक मधून दहीपूल, मेनरोड,बोहरपट्टी फिरून कपूर थळा येथे येत असतो. राम रथात भगवान श्रीरामाच्या तांब्याच्या बहुमूर्ती विराजमान असतात. हा रथ नदी घाट ओलांडून नदीपलीकडे नेला जात नाही. त्यामुळे हा रथ गणेशवाडी, गाडगे महाराज पुलाखाली म्हसोबा पटांगणावर भाविकांच्या दर्शनासाठी उभा असतो.

ABOUT THE AUTHOR

...view details