नाशिक - नाशिक ही धार्मिक आणि सांस्कृतिक नगरी असून येथे हवा चांगली असून निसर्गही चांगला आहे. त्यामुळे राज्यपालांनी राजभवन नाशिकला बांधावं म्हणजे आपल्या येण्याने आमची विकास कामे मार्गी लागतील. आरोग्य विद्यापीठाने नवीन अभ्यासक्रम इमारतीचे काम लवकर सुरू करावे, म्हणजे दोन वर्षानी इमारतीचे उदघाटनही राज्यपालांच्या हस्ते करता, असा चिमटा भुजबळांनी राज्यपालांना लगावला. महाराष्ट्र आरोग्य विज्ञान विद्यापीठाच्या नूतन इमारतीच्या उद्घाटन कार्यक्रमाप्रसंगी छगन भुजबळ आणि राज्यपालांची चांगलीच जुगलबंदी रंगली.
नाशिकच्या महाराष्ट्र आरोग्य विज्ञान विद्यापीठाच्या नूतन इमारतीचे आणि सोलर सिस्टीमचे उद्घाटन महाराष्ट्र राज्याचे राज्यपाल तथा कुलपती भगतसिंह कोश्यारी यांच्या हस्ते संपन्न झालं. यावेळी नाशिकचे पालकमंत्री छगन भुजबळ, वैद्यकीय शिक्षण मंत्री अमित देशमुख, कुलगुरू डॉ दिलीप म्हेसेकर, प्रती कुलगुरू डॉ. मोहन खामगावकर आदी उपस्थित होते. नूतन इमारतीच्या कोणशिला अनावरणानंतर मुख्य कार्यक्रम पार पडला.
राजभवन नाशिकला बांधावं म्हणजे आमची कामे लवकर मार्गी लागतील, भुजबळांचा राज्यपालांना चिमटा - छगन भुजबळ यांना राज्यपालांना चिमटा
महाराष्ट्र आरोग्य विज्ञान विद्यापीठाच्या नूतन इमारतीच्या उद्घाटन कार्यक्रमाप्रसंगी छगन भुजबळ आणि राज्यपालांची चांगलीच जुगलबंदी रंगली. नाशिकची हवा व निसर्ग चांगला असल्याने राज्यापालांनी येथेच राजभवन बांधावे म्हणजे आमची कामे लवकर होतील असा चिमटा भुजबळ यांनी काढल्यावर राज्यपालांनीही तब तक क्या सीन रहेगा, असे म्हणत त्यांना दाद दिली.
कोरोना काळात विद्यार्थ्यांचं नुकसान होऊ नये म्हणून आरोग्य विज्ञान विद्यापीठाच्या परीक्षा घेण्याचा निर्णय,प्रत्येक परीक्षार्थींना कोरोना कवच देण्याचा निर्णय घेण्यात आला..राज्यपालांच्या सूचनांची पूर्ण अंमलबजावणी केली सौर ऊर्जा निर्माती करून ऊर्जा निर्माती करू.विद्यापीठाचत पुस्तकी नाही तर प्रायोगिक संशोधन करण्याचा निर्णय.5 हजार वर्ष पुरातन आयुर्वेदाचा पुन्हा एकदा अभ्यास..आरोग्य विज्ञान विद्यापीठाच्या सर्व विषयांना 15 दिवसात मंजुरी देणार असल्याचे वैद्यकीय मंत्री अमित देशमुख यांनी म्हटलं..