महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / city

नाशिककरांवर पाणीकपातीचे संकट; येत्या आठवड्यात पाऊस न पडल्यास दर बुधवारी पाणीपुरवठा बंद - nashik water supply news

नाशिक शहराला पाणीपुरवठा करणाऱ्या गंगापूर धरणाच्या पाणलोट क्षेत्रात पावसाने दडी मारली. त्यामुळे शहराला 40 दिवस पुरेल इतकाच पाणीसाठा धरणात शिल्लक आहे.

nashik
धरणक्षेत्र

By

Published : Jul 12, 2021, 5:11 PM IST

Updated : Jul 12, 2021, 5:33 PM IST

नाशिक -नाशिक शहराला पाणीपुरवठा करणाऱ्या गंगापूर धरणाच्या पाणलोट क्षेत्रात पावसाने दडी मारली. त्यामुळे शहराला 40 दिवस पुरेल इतकाच पाणीसाठा धरणात शिल्लक आहे. त्यामुळे येत्या आठवडाभरात पाऊस न पडल्यास शहरात दर बुधवारी संपूर्ण दिवस पाणी बंद ठेवत पाणीकपात करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.

माहिती देताना नाशिकचे महापौर सतीष कुलकर्णी
  • शहराला 40 दिवस पुरेल इतकाच पाणीसाठा धरणात शिल्लक -

नाशिक शहराला पाणीपुरवठा करणाऱ्या गंगापूर धरणाच्या पाणलोट क्षेत्रात पावसाने दडी मारली. त्यामुळे शहराला 40 दिवस पुरेल इतकाच पाणीसाठा धरणात शिल्लक आहे. त्यामुळे दर बुधवारी पाणीबंद ठेवत पाणीकपात करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. महापौरांच्या दालनात झालेल्या अधिकारी आणि पदाधिकाऱ्यांच्या बैठकीत हा निर्णय घेण्यात आला आहे.

  • पाणी जपून वापरण्याचे महापौरांचे नागरिकांना आवाहन -

गंगापूर धरणात 1900 एमसीएफटी पाणीसाठा शिल्लक आहे. त्यात 300 एमसीएफटी औद्योगिक वसाहतीसाठी रोटेशन ठेवण्यात आले आहे. गंगापूर धरणात शहरासाठी 600 एमसीएफटी पाणीसाठा शिल्लक आहे, तो 40 दिवस पुरेल इतकाच आहे. रविवारपर्यंत पाऊस न आल्यास पुढील आठवड्यात पाणीकपातीचा निर्णय घेण्यात येईल, त्यामध्ये आठवड्याला 1 दिवस पाणीपुरवठा बंद करण्याचा विचार असल्याचे महापौर सतिष कुलकर्णी यांनी सांगितले आहे. शहराला पाणीपुरवठा करणाऱ्या मुकणे व दारणा धरण समुहात 25 टक्के साठा आहे. नागरिकांनी पाणी जपून वापरण्याचे आवाहन महापौर कुलकर्णी यांनी केले आहे.

हेही वाचा -सहकार खाते शाह यांच्याकडे गेल्याने घाबरण्याचे कारण नाही - संजय राऊत

Last Updated : Jul 12, 2021, 5:33 PM IST

ABOUT THE AUTHOR

...view details