महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / city

विजेचा दाब वाढल्याने एकाच वेळी जळाली शेकडो उपकरणे, नाशिकच्या सिडको परिसरातील घटना

अचानक विजेचा दाब वाढल्याने एकाच वेळी नाशिकमधील सिडको परिसरातील अनेक घरातील उपकरणे जळून खाक झाली. उत्तमनगरमधील वृंदावन नगर, शिवपुरी चैक,समर्थ चौक परिसरात ही घटना घडली.

Hundreds of appliances burn at the same time due to increased Electricity   pressure
विजेचा दाब वाढल्याने एकाच वेळी जळाली शेकडो उपकरणे,

By

Published : Jan 9, 2020, 8:39 PM IST

नाशिक -अचानक विजेचा दाब वाढल्याने एकाच वेळी नाशिकमधील सिडको परिसरातील अनेक घरातील उपकरणे जळून खाक झाली. उत्तमनगरमधील वृंदावन नगर, शिवपुरी चौक, भगवती चौक, समर्थ चौक, परिसरात ही घटना घडली. या घटनेत जवळपास ३०० ते ४०० घरातील फ्रीज, कॉम्प्युटर, मिक्सर, चार्जर, सेट टॉप बॉक्स अशी महागडी उपकरणे जळाली. घटनेची माहिती महावितरणला माहिती दिली. मात्र, घटना घडून बराच कालावधी लोटल्याने अद्याप महावितरणच्या एकाही अधिकाऱ्याने घटनास्थळी येऊन पाहणी केलेली नाही. त्यामुळे संतप्त नागरिकांनी महावितरण कार्यालयावर मोर्चा काढत महावितरण कार्यालयात ठिय्या मांडला.

महावितरण कार्यालयाच्या अधिकाऱ्यांना याबाबतची कल्पना दिल्यानंतरदेखील याठिकाणी एकाही अधिकाऱ्याने घटनास्थळी येऊन पाहणी केली नाही. त्यामुळे संतप्त नागरिकांनी महावितरण कार्यालयावर मोर्चा काढाला. मात्र, कार्यालयातही अधिकारी उपस्थित नसल्याने याच ठिकाणी नगरसेविका मुकेश शहाणे व परिसरातील नागरिकांनी महावितरण कार्यालयात ठिय्या मांडला. यावेळी महावितरणच्या गलथान कारभाराचा निषेध करत भरपाई देण्याची मागणी नागरिकांनी केली.

या घटनेत सिडको परिसरातील नागरिकांचे फ्रिज, कॅम्पुटर, फँन, सेट टॉप बॉक्स, चार्जर, मिक्सर जळून खाक झाले आहेत. अचानक विजेचा दाब वाढून अनेक वेळा अशा घटना या आधी घडल्या आहेत. वेळोवेळी महावितरणला तक्रार देऊनही कारवाई केली जात नसल्याचे नगरसेवक मुकेश शहाणे यांनी सांगितले.

ABOUT THE AUTHOR

...view details