नाशिक- शहरातील प्रसिध्द रामा हेरिटेज हॉटेल मध्ये गॅस सिलिंडरचा स्फोट होऊन रुपेश गायकवाड या कर्मचाऱ्याचा मृत्यू झाल्याची घटना घडली. मात्र ही आकस्मिक घटना नसून घातपात असल्याचा आरोप रुपेशच्या नातेवाईकांनी केला आहे. या घटनेबाबत मुंबई नाका पोलीस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे. सिलिंडरच्या स्फोटाची ही घटना शऩिवारी मध्यरात्रीच्या सुमारास घडली आहे.
नाशिकच्या हॉटेल रामा हेरीटेजमध्ये सिलिंडरच्या स्फोटात कर्मचाऱ्याचा मृत्यू, नातेवाईंकडून घातपाताचा आरोप - working as a cook
रामा हेरीटेज हॉटेल मध्ये कर्मचाऱ्याचा सिलिंडरच्या स्फोटात मृत्यू झाल्याचे हॉटेल प्रशासनाकडून सांगण्यात येत आहे. मात्र घटना घडल्यानंतर या बाबतची माहिती मृताच्या कुटुबीयांना वेळेत दिली नाही, त्यामुळे ही दुर्घटना नसून घातपात असल्याचा आरोप मृत कर्मचाऱ्याच्या नातेवाईंकांनी केला आहे.
गॅस सिलिंडरचा स्फोट झाल्यानंतर माझे पती जखमी झाले होते,असे हॉटेल प्रशासनाकडून सांगण्यात आले. त्याच्या मृत्यूची माहिती आम्हाला दिली नव्हती. आम्हाला सिव्हिल रुग्णालयात यायला सांगितले. मात्र तिथे आम्हाला मृतदेह आढळून आला. त्यामुळे आम्हाला या दुर्घटनेबाबत हा घातपात असल्याचा संशय आहे. तसेच काही दिवसापूर्वी तिचे पती रुपेश यांचे हॉटेलच्या व्यवस्थापकासोबत भांडण झाले होते, असेही तिने पोलिसांनी सांगितले असून या मृत्यू प्रकरणाची सखोल चौकशी कारावी अशी, मागणी मृतांच्या नातेवाईंकांनी केली आहे.