महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / city

Home Minister : सोमैयांना पोलीस ठाण्यात जाण्याची गरज काय ?, गृहमंत्र्यांचा सवाल - Kirit Somaiya

भोंग्यावरुन ( Loud Speaker ) राज्यात सुरू असलेल्या गोंधळाच्या पार्श्वभूमीवर सोमवारी (दि. 25 एप्रिल) विरोधी पक्षातील सर्व प्रमुख नेत्यांची बैठक बोलावली असल्याची माहिती गृहमंत्री दिलीप वळसे पाटील यांनी दिली. बैठकीत त्यांचे मत जाणून घेत विचारविनिमय करू. चर्चा केल्यानंतर सरकार भोंग्याबाबत निर्णय घेईल, असेही त्यांनी सांगितले.

गृहमंत्री दिलीप वळसे पाटील
गृहमंत्री दिलीप वळसे पाटील

By

Published : Apr 24, 2022, 7:10 PM IST

नाशिक- किरीट सोमैयांना ( BJP Leader Kirit Somaiya ) पोलीस ठाण्यात जाण्याची काय गरज होती, असा सवाल उपस्थित करत तिथे जाऊन विनाकारण संघर्ष वाढवण्याचे काम केले, असा आरोप गृहमंत्री दिलीप वळसे पाटील ( Home Minister Dilip Walse Patil ) यांनी केला आहे. झाले ते चांगल झालं नाही, असेही ते म्हणाले. महाराष्ट्र पोलीस अकादमीमध्ये दीक्षांत समारंभासाठी आल्यानंतर ते माध्यमांशी बोलत होते.

बोलताना गृहमंत्री वळसे पाटील

सोमैया यांच्या वाहनावर झालेला हल्ला हा चुकीचा -महाविकास आघाडी सरकार सत्तेत आल्यापासून हे सरकार सत्तेत राहायला नको हा विरोधकांचा प्रयत्न आहे. त्यासाठी ज्या क्लुप्त्या करायच्या त्या वापरल्या जात आहेत आणि हा त्याचाच एक भाग असल्याचे गृहमंत्र्यांनी सांगितले. राणा दाम्पत्याच्या कृती मागे नक्कीच कुणाचा तरी हात आहे. त्याशिवाय ते असे धाडस करू शकत नाहीत. राणा दाम्पत्याने केलेल्या आंदोलनामागे कोणाचा हात आहे, याचा शोध घेण्याचा काम पोलीस करत आहे आणि त्यांच्यावर कारवाईही केली जाईल, अशी माहिती राज्याचे गृहमंत्री दिलीप वळसे पाटील यांनी दिली.

सोमैया यांच्या गाडीवर झालेला हल्ला हा चुकीचा -नियमानुसार अटकेत असलेल्या व्यक्तीला केवळ त्यांचे नातेवाईक किंवा वकीलच भेटू शकतात. लोकप्रतिनिधी म्हणून सोमैयांना पोलीस ठाण्यात जाण्याचा अधिकार आहे. पण, अटकेत असलेल्या व्यक्तीला भेटायला जायचे काहीच कारण नाही, असे ते म्हणाले. त्यांनी चुकीचे पाऊल उचलले म्हणून ही घटना घडली. किरीट सोमैया यांच्या गाडीवर झालेला हल्ला हा चुकीचा ( Kirit Somaiyas car smashed ) आहे. त्याचे कोणीही समर्थन करू शकत नाही. पण, सोमैयांनी एवढी तत्परता का दाखवली हा प्रश्न उपस्थित करून ते म्हणाले, या सर्व प्रकरणाचा तपास पोलीस करत आहे. याबाबतचा वाहनावर दगडफेक केल्याचा गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे.

भोंग्याबाबत उद्या बैठक -भोंग्यावरुन सुरू असलेल्या गोंधळाच्या पार्श्वभूमीवर सोमवारी (दि. 25 एप्रिल) विरोधी पक्षातील सर्व प्रमुख नेत्यांची बैठक बोलावली असल्याची माहिती गृहमंत्री दिलीप वळसे पाटील यांनी दिली. बैठकीत त्यांचे मत जाणून घेल्यानंतर विचारविनिमय करुन सरका चर्चा केल्यानंतर सरकार निर्णय घेईल, असेही त्यांनी सांगितले.

हेही वाचा -Ajit Pawar : भान ठेवा, उचकवण्याचं काम करू नका : अजितदादांनी टोचले राणांचे कान

ABOUT THE AUTHOR

...view details