नाशिक -जिल्ह्यात कोरोनाच्या पार्श्वभूमीवर 23 मेपर्यंत कडक लॉकडाऊन असल्याने ओझर येथील लढाऊ विमान बांधणी आणि दुरुस्तीचा एचएएल कारखाना देखील 23 मेपर्यंत बंद राहणार आहे. मात्र कारखाना बंद असल्याने कामगारांना जुलैमध्ये सुट्ट्या भरून द्यावा लागणार असल्याने कामगारांनी याबाबत नाराजी व्यक्त केली आहे.
कामगारांची व्यवस्थापनाच्या कारभारावर व्यक्त केली नाराजी
कोरोनाच्या पार्श्वभूमीवर नाशिक जिल्ह्यामध्ये 23 मेपर्यंत कडक लॉकडाऊन असल्याने ओझर येथील येथील एचएएल कामगारांना 12 मे रोजी पोलिसांनी अडवले आणि नाशिक व परिसरात राहणाऱ्या कामगारांना घरी पाठवले. त्यानंतर व्यवस्थापनाला जाग आली आणि 15 ते 23 मेपर्यंत कारखाना बंद ठेवण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. तरी सर्व कामगारांना जुलै महिन्यात या सुट्ट्या भरून द्यावे लागणार असल्याने कामगारांनी व्यवस्थापनाच्या कारभारावर नाराजी व्यक्त केली आहेत.