दिंडोरी (नाशिक) :निसर्ग चक्रीवादळामुळे नाशिक जिल्ह्यातील फळबागांचे अतोनात नुकसान झाले आहे. जिल्ह्यात फळबागांसह ऊस, भाजीपाला पिकांचे प्रचंड नुकसान झाले. द्राक्षे, डाळिंब, केळी बागांसह शेतीपूरक व्यवसायांनाही चांगलाच फटका बसला आहे. कोरोनानंतर निसर्गानेच रौद्र रुप धारण केल्याने शेतकरी अगदी मेटाकुटीला आला आहे. त्यामुळे शेतकऱ्यांनी नुकसानीचे तत्काळ पंचनामे करून भरपाई देण्याची मागणी केली आहे.
दिंडोरी तालुक्यातील जानोरी येथील शेतकऱ्यांच्या शेतमालाचे आणि शेतीचे अतोनात नुकसान... हेही वाचा...फळांमध्ये बॉम्ब लपवून घेतात वन्यप्राण्यांचा जीव, गडचिरोलीत अतिशय क्रुरपद्धतीने होते शिकार
दिंडोरी तालुक्यात जानोरी येथील द्राक्ष बागायतदार जगन्नाथ दामू बोस आणि भाजीपाला पिकवणारे कैलास माधवराव डवणे या शेतकऱ्यांचे निसर्ग चक्रीवादळामुळे लाखो रुपयांचे नुकसान झाले आहे. या अगोदरच कोरोना विषाणू आणि त्यामुळे सुरू असलेल्या लॉकडाऊनमुळे द्राक्ष बागायतदार शेतकऱ्यांचा पूर्ण हंगाम वाया गेला होता.
संपूर्ण हंगामात द्राक्ष उत्पादकांना द्राक्ष विक्रीसाठी बाजारपेठ उपलब्ध नसल्याने द्राक्ष पिकायला लागले आहे. त्यानंतर शेतकऱ्यांनी वेगवेगळे भाजीपाल्याचे पिक घेतले. त्यापैकी कोथिंबीर पिकाला चांगला बाजार असताना आता निसर्ग चक्रीवादळाने हा हातातोंडाशी आलेला घास देखील हिरावून नेला आहे. त्यामुळे बळीराजा पूर्णतः हवालदिल झाला आहे. सरकारने नुकसान झालेल्या ठिकाणचे पंचनामे लवकरात लवकर करून नुकसान भरपाई द्यावी, अशी मागणी शेतकर्यांनी केली आहे.