महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / city

राज्यातील नुकसानीचा आढावा घेण्याचे काम सुरू - कृषीमंत्री दादा भुसे - dada bhuse

जोरदार पावसाने शेतीचे अतोनात नुकसान झाले आहे. शेतीशिवाय रस्ते, शाळा, शासकीय इमारती आणि इतर मालमत्तांचेही मोठे नुकसान झाले आहे. जिरायती, बागायती व फळबागांच्या झालेल्या नुकसानीचे पंचनामे केले जातील, असे भुसे यांनी यावेळी सांगितले.

राज्यातील नुकसानीचा आढावा घेण्याचे काम सुरु - कृषीमंत्री दादा भुसे
राज्यातील नुकसानीचा आढावा घेण्याचे काम सुरु - कृषीमंत्री दादा भुसे

By

Published : Oct 1, 2021, 7:25 AM IST

Updated : Oct 1, 2021, 7:58 AM IST

नाशिक : अतिवृष्टीमुळे राज्यात ठिकठिकाणी शेतपिकांचे मोठे नुकसान झाले असून मराठवाड्यात नुकसानीचे प्रमाण अधिक आहे. शासनाचे परिस्थितीवर लक्ष असून नुकसानीचे पंचनामे करण्याचे आदेश यंत्रणेला देण्यात आल्याची माहिती कृषीमंत्री दादा भुसे यांनी दिली आहे. गुरूवारी नाशिकमध्ये पत्रकारांशी ते बोलत होते.

राज्यातील नुकसानीचा आढावा घेण्याचे काम सुरू - कृषीमंत्री दादा भुसे

सर्व नुकसानीचे पंचनामे करणार

जोरदार पावसाने शेतीचे अतोनात नुकसान झाले आहे. शेतीशिवाय रस्ते, शाळा, शासकीय इमारती आणि इतर मालमत्तांचेही मोठे नुकसान झाले आहे. जिरायती, बागायती व फळबागांच्या झालेल्या नुकसानीचे पंचनामे केले जातील, असे भुसे यांनी यावेळी सांगितले. पावसामुळे झालेल्या नुकसानीचे पंचनामे करण्याचे स्टँडिंग ऑर्डर प्रशासनाला दिले आहे. शेतपिकांबरोबरच जीवित व वित्तहानीचेही पंचनामे केले जात आहे. लवकरच मदतीबाबत योग्य तो निर्णय घेतला जाईल असे भुसे म्हणाले.

34 हजार हेक्‍टरवरील पिकांचे नुकसान
चार दिवसांपासून जिल्ह्यात सुरू असलेल्या पावसामुळे सुमारे 34 हजार हेक्‍टरवरील खरीप पिकांचे नुकसान झाले आहे. सर्वात जास्त नुकसान मालेगाव आणि नांदगाव तालुक्यात झाले असून याबाबतचा अहवाल कृषी विभागाने सादर केला आहे. पंचनामे पूर्ण झाल्यानंतरच नुकसानीची आकडेवारी समोर येईल असे जिल्हा प्रशासनाच्या वतीने स्पष्ट करण्यात आले आहे.

नाशिकमध्ये अतिवृष्टी
नाशिक जिल्ह्यात सप्टेंबर महिन्यात चांगला पाऊस झाला. त्यातही 27 ते 29 सप्टेंबर या कालावधीत जिल्ह्याच अतिवृष्टीसारखी परिस्थिती निर्माण झाली. 29 सप्टेंबर रोजी जिल्ह्याला गुलाब चक्रीवादळाचा तडाखा बसला. त्यामुळे जिल्ह्यात शेतपिकांचे मोठे नुकसान झाले आहे. नांदगाव, मालेगाव, निफाड, दिंडोरीत सर्वाधिक नुकसान झाले असून कृषी विभागाने प्रथमदर्शनी केलेल्या पाहणीत जिल्ह्यात सुमारे 34 हजार हेक्‍टरवरील खरीप पिकांचे नुकसान झाले आहे. यात 23 हजार हेक्टरवरील कांदा, 18 हजार 965 हेक्टरवरील मका, 1381 हेक्टरवरील सोयाबीन, 6450 हेक्टरवरील बाजरी तर सुमारे वीस हजार 252 हेक्टरवरील कपाशीच्या नुकसानीचा अंदाज आहे. कपाशीचे सर्वाधिक नुकसान मालेगावमध्ये झाले आहे. मालेगावात चार हजार 566 हेक्टरवरील शेतपिकांच्या नुकसानीचा प्राथमिक अंदाज व्यक्त करण्यात येत आहे. कृषी विभागाने हा प्रथमदर्शनी अंदाज जिल्हा प्रशासनाला सादर केला असून पंचनामे करण्याचे आदेश जिल्ह्यात देण्यात आलेले आहे. कृषी अधिकारी पंचनामे करत असून हे पंचनामे पूर्ण झाल्यानंतरच पूर्ण नुकसानीची माहिती समोर येणार आहे.

हेही वाचा -नुकसानग्रस्त भागातील ८१ टक्के पंचनामे पूर्ण, मदतीचा लवकरच निर्णय - वडेट्टीवार

Last Updated : Oct 1, 2021, 7:58 AM IST

ABOUT THE AUTHOR

...view details