महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / city

मनमाडमध्ये लुटमारीच्या घटनात वाढ; नगरपरिषद अभियंत्यासह एकाला लुटारुंनी लुटले - मनमाड

पाणी पुरवठा अभियंता काजवे यांना रेल्वे ओव्हर ब्रीजजवळ तिघांनी अडवून मारहाण केली. त्यांच्याजवळील मोबाईल आणि पाकीट चोरट्यांनी लुटले. परंतु, पोलिसांनी फक्त मोबाईल हरवल्याचा गुन्हा दाखल केला आहे.

लुटमार करताना चोरटे सीसीटीव्हीत कैद

By

Published : May 21, 2019, 5:24 PM IST

नाशिक - मनमाड नगरपरिषदेतील पाणी पुरवठा अभियंता अमृत काजवे यांना ३ जणांच्या टोळीने मारहाण करून लुटले आहे. ही लुटमारीची घटना आज (मंगळवार) पहाटे तुफान चौकात घडली आहे.

लुटमार करताना चोरटे सीसीटीव्हीत कैद

काजवे शिवशाही बसने उतरल्यानंतर पायी घरी जात असताना रेल्वे ओव्हर ब्रिजवर लुटाऱ्यांनी अडवून मारहाण केली आणि त्यांचा पाकीट मोबाईल लुटून पसार झाले. पाकिटात रोख रकमेसह एटीएम, पॅन कार्डसह इतर वस्तू होत्या. काजवे यांना लुटल्यानंतर या टोळीने तुफान चौकातून जाणाऱ्या एका प्रवाशाचा पाठलाग करत त्यालाही लुटले आहे. हा सर्वप्रकार सीसीटीव्हीत कैद झाला आहे.

लुटमारीच्या घटनेनंतर काजवे आणि दुसऱ्या प्रवाशाने पोलीस ठाण्यात तक्रार दिली. परंतु, पोलिसांनी लुटमारीचा गुन्हा दाखल करण्याऐवजी मोबाईल हरवल्याचा गुन्हा दाखल केला आहे. शहरात याआधीही लुटमारीच्या घटना घडल्या आहेत. यामुळे पोलीस गुन्हेगारांना पाठीशी घालत आहे का? असा प्रश्न उपस्थित होत आहे.

ABOUT THE AUTHOR

...view details