नाशिक - नाशिकच्या एका नागरिकाने ड्रेनेज चेंबर संदर्भात ऑनलाइन तक्रार केली होती. त्याने महापालिकेच्या वेबसाईट तक्रार केली होती. ही वेबसाईट बनावट असल्याचे समोर आले आहे. तक्रार करताना या नागरिकाकडून सुरुवातीला वीस रुपये तक्रार शुल्क घेण्यात आले. त्यानंतर संबंधित व्यक्तीच्या खात्यातून दोन टप्प्यांत 29 हजार 778 रुपये काढण्यात आले. याबाबत या व्यक्तीने सायबर पोलिसांकडे तक्रार दिली आहे. मात्र, महानगरपालिकेने ही वेबसाईट बनावट नसून, आपण चुकीच्या संकेतस्थळवर गेल्यामुळे ही फसवणूक झाल्याचे म्हटले आहे.
29 हजर 778 रुपये ऑनलाइन भरले
नशिक येथील दिंडोरी रोडवरील रहिवाशी योगेश पाटील यांनी (24 जून)रोजी ड्रेनेजच्या चेंबर संदर्भात https://www.complaintboard.in/complaintboard-reviews/nashik-nmc-l५६९९२४ .html) या वेबसाईटवर तक्रार दाखल केली होती. मात्र, ही वेबसाईट बनावट असल्याचे समोर आले आहे. वेबसाईटवर तक्रार केल्यानंतर पाटील यांना (९७०७७ ५७३५५)या मोबाईलवरुन कॉल आला. तसेच, पुढील ७२ तासांत तक्रार निवारण केले जाईल असेही सांगितले. दरम्यान, या तक्रारीसाठी नाममात्र शुल्क भरावे लागेल असे कळवले. त्यानंतर शुल्क भरण्यासाठी ऑनलाईन लिंक दिली. यामध्ये दोन टप्यात 29 हजर 778 रुपये ऑनलाइन भरले. मात्र, इतर ठिकाणी चौकशी केली असता, पाटील यांच्या आपली आर्थिक फसवणूक झाल्याचे लक्षात आले. यानंतर तत्काळ त्यांनी सायबर पोलिसांत तक्रार दिली आहे.