नाशिक- त्र्यंबकेश्वर येथे गेल्या 24 तासात 315 मिलीमीटर विक्रमी पाऊस झाल्याने शहरात पूरस्थिती निर्माण झाली आहे. शहरात सकाळी आठ (रविवार) वाजेच्या सुमारास मेनरोड, तेली गल्ली, लक्ष्मीनारायण चौक, गंगासागर तलावाच्या बाजूस असलेल्या रस्त्यावर अनेक ठिकाणी दोन ते तीन फुटांपर्यंत पाणी वाहत होते. मेनरोड आणि तेली गल्ली परिसरात घरांसह दुकानांमध्ये पाणी शिरल्याने मोठे नुकसान झाले. रस्त्यावर उभ्या असलेल्या चारचाकी आणि दुचाकी वाहनांमध्ये पाणी शिरल्याने त्यांचेही नुकसान झाले आहे.
त्र्यंबकेश्वरावर अखंड जलाभिषेक! शहरात पूरस्थिती; 24 तासात 315 मिलिमिटर पाऊस - Trimbakeshwar
त्र्यंबकेश्वर येथे गेल्या 24 तासात 315 मिलीमीटर विक्रमी पाऊस झाल्याने शहरात पूरस्थिती निर्माण झाली आहे. अहिल्या धरण ओव्हर फ्लो झाले असून गंगासागर तलाव तुडुंब भरला आहे.
पावसाचे पाणी त्र्यंबकेश्वर मंदिराच्या पश्चिम दरवाजातून आत घुसले आहे. त्यामुळे दर्शनबारीत उभे असलेल्या भाविकांना अडचण होत आहे. नाशिक-त्र्यंबक रस्त्यावर गजानन महाराज संस्थानजवळ असलेल्या पुलावर देखिल पाणी आले आहे.
अहिल्या धरण ओव्हर फ्लो झाले असून गंगासागर तलाव तुडुंब भरला आहे. प्लास्टिक कचऱ्याने जागोजागी पाणी तुंबल्याचे पाहायला मिळाले. शहरातील सखल भागात जवळपास सर्व रस्त्यांवर पाणीच पाणी पहावयास मिळाले. त्र्यंबकेश्वर येथे पावसाचे पाणी मोठ्या प्रमाणात साचते म्हणून जिल्हाधिकाऱ्यांनी पंधरा दिवसांपूर्वी पाहणी दौरा केला होता. त्यानंतरही परिस्थिती कायम असल्याने नागरिकांकडून संताप व्यक्त केला जात आहे.