महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / city

खड्डे बुजवा, अन्यथा अभियंत्यांना त्याच खड्ड्यात बसवू; मनसेचा इशारा - otherwise we will put engineers

नाशिक शहरातील खड्यांचा प्रश्न पुन्हा एकदा ऐरणीवर आला असून आता संबंधित इंजिनिअर्सनी रस्त्यावरील खड्डे तातडीने बुजवावे, अन्यथा त्या इंजिनिअर्सना त्याच खड्ड्यांमध्ये बसवेल, असा मनसे स्टाईल इशारा मनसेचे सरचिटणीस संदीप देशपांडे यांनी नाशिकमध्ये माध्यमांशी संवाद साधत असताना दिला आहे.

मनसे सरचिटणीस संदीप देशपांडे
मनसे सरचिटणीस संदीप देशपांडे

By

Published : Jul 29, 2021, 8:37 PM IST

नाशिक - नाशिक शहरातील खड्यांचा प्रश्न पुन्हा एकदा ऐरणीवर आला असून आता संबंधित इंजिनिअर्सनी रस्त्यावरील खड्डे तातडीने बुजवावे, अन्यथा त्या इंजिनिअर्सना त्याच खड्ड्यांमध्ये बसवेल, असा मनसे स्टाईल इशारा मनसेचे सरचिटणीस संदीप देशपांडे यांनी नाशिकमध्ये माध्यमांशी संवाद साधत असताना दिला आहे.

नाशकात खड्डे बुजवा अन्यथा अभियंत्यांना त्याच खड्ड्यात बसवू, मनसेचा इशारा

राजकारण बाजूला ठेवून मनसे काळातील प्रकल्पांची सुधारणा करावी

मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांच्या संकल्पनेतून तयार झालेल्या प्रकल्पांची आज अमित ठाकरे यांनी पाहणी केली. यावेळी राजकारण बाजूला ठेवून पालिका आयुक्तांनी या प्रकल्पांची सुधारणा करण्याची मागणी मनसे सरचिटणीस संदीप देशपांडे यांनी केली असून आम्ही ठाकरे यांच्या नेतृत्वाखाली मनसे नाशिक महापालिकेच्या निवडणुका लढवणार असल्याचं देखील त्यांनी सांगितले आहे. महानगरपालिका आयुक्तांची भेट घेतल्यानंतर झालेल्या चर्चेदरम्यान संदीप देशपांडे हे बोलताना म्हणाले की महाराष्ट्र नवनिर्माण सेनेला कोरोना काळात कोणतेही आंदोलन करण्यात रस नाहीये, परंतु जर नाशिक शहरात दरवर्षी खड्ड्यातून प्रवास करावा लागत असेल तर त्याला जबाबदार कोण असा प्रश्न उपस्थित करून ते म्हणाले की हे खड्डे बुजवायला पाहिजे होते. परंतु ते वेळीच न केल्यामुळे नागरिकांना त्रास होत आहे. त्यामुळे तातडीने खड्डे बुजवा, अन्यथा मनसे आपल्या स्टाईलने आंदोलन करेल असा इशारा दिला आहे.

राज ठाकरेंच्या संकल्पनेतून तयार झालेल्या प्रकल्पांची अमित ठाकरेंनी केली पाहणी
आगामी महापालिका निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या वतीने नाशिकमध्ये जोरदार पक्षसंघटन आणि तयारीला सुरुवात केली आहे. याचाच एक भाग म्हणून युवा नेते अमित ठाकरे हे बुधवारपासून दोन दिवसांच्या नाशिक दौऱ्यावर दाखल झाले आहेत. दरम्यान गुरुवारी अमित ठाकरे मनसे सरचिटणीस संदीप देशपांडे आणि अमेय खोपकर यांनी मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांच्या संकल्पनेतून साकार करण्यात आलेल्या प्रकल्पांची पाहणी केली. यावेळी अनेक ठिकाणी या प्रकल्पांची दुरावस्था झाल्याचे निदर्शनास आल्याने राजकारण बाजूला ठेवून मनसे काळातील प्रकल्पांची सुधारणा करावी, अशी मागणी मनसे सरचिटणीस संदीप देशपांडे यांनी महापालिका आयुक्तांकडे केली आहे. तर आगामी नाशिक महापालिका निवडणुका मनसे अमित ठाकरे यांच्या नेतृत्वाखाली लढवणार असल्याचंही यावेळी देशपांडे यांनी स्पष्ट केले आहे.

सत्ताधारी भाजप मनसेचे प्रकल्प स्मार्ट सिटी म्हणून दाखवते - देशपांडे

दरम्यान, या दौऱ्यात चिल्ड्रन्स पार्क, बोटणीकल पार्क, जलशुद्धीकरण केंद्र, शस्त्र संग्रहालय यासह अनेक ठिकाणांची पाहणी केली असून सत्ताधारी भाजप मनसेचे प्रकल्प स्मार्ट सिटी म्हणून दाखवत असून मनसेच्या कामावर भाजप आपली पोळी भाजत असल्याचा टोला देखील देशपांडे यांनी सत्ताधारी भाजपाला लगावला आहे. दरम्यान आता युवानेते अमित ठाकरे यांच्या नेतृत्वाखाली मनसे निवडणूका लढवणार असल्याचे स्पष्ट झाल्याने मनसे पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांमध्ये उत्साहाचे वातावरण निर्माण झाले आहे.

उद्धव ठाकरे हे कोयना प्रकल्प वर पोहोचू शकत नाही, तर ते दिल्लीत कसे पोहोचतील?
संजय राऊत यांनी उद्धव ठाकरे हे देशाचे नेतृत्व करतील असे सांगितले आहे. परंतु उद्धव ठाकरे हे कोयना प्रकल्प वर पोहोचू शकत नाही, तर ते दिल्लीत कसे पोहोचतील ? असा प्रश्न उपस्थित करून म्हणाले की, नाशिक महानगरपालिकेची निवडणूक अमित ठाकरे यांच्या नेतृत्वाखाली महाराष्ट्र नवनिर्माण सेना लढविणार आहे असे त्यांनी स्पष्ट केले आहे.

हेही वाचा -राज्यातील हे २५ जिल्हे निर्बंधमुक्त होणार, आरोग्यमंत्री राजेश टोपेंची महत्त्वपूर्ण घोषणा

हेही वाचा -मलबेरी सेवनाचे वजन कमी करण्यासह हे आहेत फायदे, संशोधनातून झाले सिद्ध

ABOUT THE AUTHOR

...view details