महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / city

येवल्यातील शिक्षकाने गावातल्या भिंतीवर रंगवले इंग्रजी शब्द व मराठी अर्थ

मुलांच्या मनातील इंग्रजी वाचण्याची बोलण्याची भीती दूर व्हावी तसेच घराघरात इंग्रजी पोहोचवण्याकरिता "माय इंग्लिश व्हिलेज "हा अभिनव उपक्रम राबवला आहे. येवला तालुक्यातील दुगलगावमधील शिक्षक राहुल धुमाळ व गावातील ग्रामस्थांच्या लोकसहभागातून संपूर्ण गावातील भिंतीवर इंग्रजी शब्द व त्याचे मराठी अर्थ रेखाटले जात आहे.

yeola
yeola

By

Published : Sep 20, 2021, 5:01 PM IST

Updated : Jul 23, 2022, 11:51 AM IST

येवला (नाशिक) - तालुक्यातील दुगलगाव येथील जिल्हा परिषद शाळेचे शिक्षक राहुल धुमाळ यांनी विद्यार्थ्यांना इंग्रजी बोलणे शक्य व्हावे यासाठी गावातील भिंतींवर इंग्रजी शब्द व त्याचे मराठी अर्थ रेखाटले आहे.

दुगलगावचा माय इंग्लिश व्हिलेज उपक्रम

भिंतीवर इंग्रजी शब्द त्याचे मराठी अर्थ
मुलांच्या मनातील इंग्रजी वाचण्याची बोलण्याची भीती दूर व्हावी तसेच घराघरात इंग्रजी पोहोचवण्याकरिता "माय इंग्लिश व्हिलेज "हा अभिनव उपक्रम राबवला आहे. येवला तालुक्यातील दुगलगावमधील शिक्षक राहुल धुमाळ व गावातील ग्रामस्थांच्या लोकसहभागातून संपूर्ण गावातील भिंतीवर इंग्रजी शब्द व त्याचे मराठी अर्थ रेखाटले जात आहे.

गावातल्या भिंतीवर रंगवले इंग्रजी शब्द व मराठी अर्थ
2 हजार शब्द रेखाटले भिंतीवरया शिक्षकाने गावामधील स्वस्त धान्य दुकान, ग्रामपंचायतची टाकी, विद्यार्थ्यांचे घरे ,गावातील मंदिरे अशा पंधरा ठिकाणी दोन हजार शब्द रेखाटले असून गावातील विद्यार्थी जाता - येता हे शब्द वाचतात. त्यातून विद्यार्थ्यांच्या शब्दकोशात व इंग्रजीतील प्रभुत्वावर भर पडते. त्यामुळे त्यांना इंग्रजी बोलणे शक्य होऊ लागले. गावातील मुले आपल्या घरी बसूनच आपल्या घराच्या भिंतीवर लिहिलेले इंग्रजी शब्द व मराठी अर्थ वाचू लागल्याने शिक्षक राऊल धुमाळ यांना खूपच समाधान वाटत आहे. हेही वाचा -राहुल गांधींविरोधातील अवमान याचिका: भिवंडी न्यायालयात १६ ऑक्टोबरला होणार सुनावणी
Last Updated : Jul 23, 2022, 11:51 AM IST

ABOUT THE AUTHOR

...view details