नाशिक - जिल्ह्यात आजपासून कोरोना लसीकरणाचा ड्राय रन मोहिमेला सुरवात झाली. यासाठी पाच ठिकाणे निश्चित करण्यात आली आहेत. या ड्राय रन साठी जिल्हा आरोग्य अधिकारी आणि कर्मचाऱ्यांची निवड करण्यात आली. नाशिक जिल्ह्यातील जिल्हा रुग्णालय, त्र्यंबकेश्वर उप जिल्हा रुग्णालय, सिध्दपिंप्री प्राथमिक आरोग्य केंद्र, नवीन बिटको, मालेगाव रुग्णालय या पाच ठिकाणी लसीकरणाचे प्रात्यक्षिक करण्यात येणार आहेत. जवजवळ पहिल्या टप्प्यात सरकारी आणि खासगी मिळून 30 हजार 105 आरोग्य अधिकारी आणि कर्मचाऱ्यांना लस दिली जाणार आहे. यासंदर्भात आज जिल्हाधिकारी आणि आरोग्य विभागाच्या अधिकाऱ्यांनी पाहणी जिल्हा शासकीय रुग्णालयात जाऊन पाहणी केली.
नाशिक जिल्ह्यात कोरोना लसीकरणाच्या ड्राय रन'ला सुरवात
जिल्ह्यात आजपासून कोरोना लसीकरणाचा ड्राय रन मोहिमेला सुरवात झाली. यासाठी पाच ठिकाणे निश्चित करण्यात आली आहेत. या ड्राय रन साठी जिल्हा आरोग्य अधिकारी आणि कर्मचाऱ्यांची निवड करण्यात आली.
अशी असेल प्रक्रीया-
प्रत्येक आरोग्य केंद्रावर एक नोडल अधिकारी व आरोग्य कर्मचारी यांची टीम बनवण्यात आली. या टीमला मास्क व ग्लोज वापरणे अनिवार्य करण्यात आले. लसीकरणासाठी तीन रूमची व्यवस्था करण्यात आली. पहिल्या वेटिंग रूममध्ये निवड करण्यात आलेल्या लाभार्थ्याला सोशल डिस्टनसिंग नियमांचे पालन करून त्याचे तापमान मोजल्या जाते. दुसऱ्या लसीकरणाच्या रूममध्ये 'कोविन अँप' या अप्लिकेशनमध्ये लाभार्थ्यांची नोंद करण्यात येईल. त्याला लसीकरणाची संपूर्ण माहिती देण्यात आल्यानंतर लसीकरण करण्यात येईल. लसीकरणानंतर तिसऱ्या ऑब्झर्वेशन रूम मध्ये लाभार्थ्यांना अर्धा तास परीक्षणासाठी बसविण्यात येईल.
हेही वाचा-२६/११चा मास्टरमाईंड लख्वीला १५ वर्षांची शिक्षा; पाकिस्तानी न्यायालयाचा निर्णय