महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / city

Lack of Planning : नाशिकमध्ये नियोजनाआभावी मुलांचे लसीकरण खोळंबले

मुंबई, औरंगाबादनंतर नाशिकमध्येही लहान मुलांच्या लसीकरणात अडचणी आल्याचे समोर आले आहे. नियोजनाआभावी नाशिक जिल्ह्यात मुलांचे लसीकरण खोळंबले. नियोजनात कुठे चूक झाली यासाठी तातडीने जिल्हाधिकारी कार्यालयात बैठक देखील झाली आहे.

By

Published : Mar 18, 2022, 8:29 AM IST

लसीकरण
लसीकरण

नाशिक- राज्यात १२ ते १४ वर्षे वयोगटातील मुलांसाठी कोरोना प्रतिबंधक लसीकरण ( Vaccination of children ) सुरु झाले आहे. मात्र नियोजनाअभावी नाशिक जिल्ह्यात लसीकरण खोळंबल आहे. मुले लसीकरणासाठी केंद्रावर पोहोचले मात्र तिथे लसच उपलब्ध नसल्याचे समोर आले. लसीकरणाच्या पहिल्याच दिवशी हा प्रकार घडल्यानंतर जिल्हाधिकाऱ्यांनी तातडीने बैठक बोलावली होती.

लसीकरणाच्या पहिल्या दिवशी सकाळच्या सत्रात लसीकरण केंद्रावर लस उपलब्ध नसल्याची माहिती मिळाली. त्यांतर दुपारी नंतर लसीकरण सुरू होणार असल्याचे सांगण्यात आले. मुलांच्या लसीकरणासंदर्भात जिल्हा प्रशासन आणि आरोग्य विभागाच्या या अशा कारभारमुळे मुलांना आणि त्यांच्या पालकांना मात्र मनःस्ताप सहन करावा लागला.

लसीकरण संदर्भात तातडीने जिल्हाधिकारी कार्यालयात बैठक बोलावण्यात आली. सकाळच्या सत्रात लसीकरण का सुरु झाले नाही, याचा आढावा घेण्यात आला. नियोजन नसल्याने सकाळच्या सत्रात लसीकरण सुरू झाले नाही, अशी माहिती समोर येत आहे.

नाशिक जिल्ह्यातील अधिकाऱ्यांना असलेल्या इतर जबाबदाऱ्या आणि त्यांच्या मागे असलेल्या काम आणि बैठकांमुळे आरोग्य विभागाकडून कोणत्याही प्रकारचे नियोजन केले गेले नाही. जिल्हा प्रशासनाला लसीकरणाबाबतची कोणतीही माहिती कळविण्यात आली नाही. त्यामुळे लसीकरणाच्या पहिल्या दिवशी सकाळी राज्यात लसीकरण सुरू झाल्यानंतरही नाशिकमध्ये विद्यार्थ्यांना लसीकरण केंद्रामध्ये गेल्यानंतर लस उपलब्ध नसल्याची माहिती सांगण्यात आली. त्यानंतर ही बाब प्रशासनाच्या लक्षात आल्यानंतर, तातडीने नियोजन करण्यासाठी जिल्हाधिकारी गंगाधरन यांनी बैठक बोलवली. आरोग्य विभागाचे वरिष्ठ अधिकारीदेखील या बैठकीला उपस्थित होते.

हेही वाचा : औरंगाबादेत पहिल्या दिवशी फक्त २० मुलांचे लसीकरण, १२ ते १४ वयोगटातील मुलांच्या लसीकरणाल थंड प्रतिसाद

ABOUT THE AUTHOR

...view details