महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / city

स्वच्छता सर्वेक्षणात देवळाली राज्यात प्रथम, देशपातळीवर 52वरून 4थ्या स्थानी उडी - स्वच्छता सर्वेक्षण

स्वच्छता सर्वेक्षणा(swachh survekshan)त देवळाली कॅन्टोन्मेंट बोर्डा(Deolali Cantonment Board)ने देशभरातील ६४ कॅन्टोन्मेंट बोर्डात ४थे तर राज्यात प्रथम स्थान पटकावले आहे. सर्वेक्षणात देवळाली कॅन्टोन्मेंट बोर्डाने ३१८५ गुण मिळावीत राज्यात प्रथम तर देशात चौथे स्थान पटकावले.

Deolali Cantonment Board
Deolali Cantonment Board

By

Published : Nov 21, 2021, 1:38 PM IST

नाशिक - स्वच्छता, सौंदर्यीकरणावर दिलेला भर, आरोग्य कर्मचाऱ्यांनी कोरोना काळातही झोकून केलेल्या कार्याची पावती म्हणून स्वच्छता सर्वेक्षणा(swachh survekshan)त देवळाली कॅन्टोन्मेंट बोर्डा(Deolali Cantonment Board)ने देशभरातील ६४ कॅन्टोन्मेंट बोर्डात ४थे तर राज्यात प्रथम स्थान पटकावले आहे. सर्वेक्षणात देवळाली कॅन्टोन्मेंट बोर्डाने ३१८५ गुण मिळावीत राज्यात प्रथम तर देशात चौथे स्थान पटकावले.

कामगिरी उंचावली

स्वच्छ देवळाली-सुंदर देवळाली व हरित देवळाली असे ब्रीद असणाऱ्या देवळाली कॅन्टोन्मेंट बोर्डात गेल्या दोन वर्षात सर्वेक्षणात ५२ व ३९व्या स्थानावर झालेली घसरण भरून काढण्यासाठी मागील वर्षांपासून गत काळातील मुख्य कार्यकारी अधिकारी अजय कुमार व सध्याचे मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. राहुल गजभिये यांच्या मार्गदर्शनाखाली आरोग्य अधीक्षक अमन गुप्ता यांनी आरोग्य विभागाची जबाबदारी स्वीकारल्यानंतर कामाचे केलेले नियोजन, वेळोवेळी स्वच्छता मोहीम, आठही वार्डांमध्ये घंटागाड्यांचे योग्य नियोजन, शहरातील गटाराच्या पाण्यावर प्रक्रिया करण्यासाठी कार्यान्वित करण्यात आलेला सीएसटीपी प्लांट, शहरातील सौंदर्यीकरणासाठी केली जाणारी कलात्मकता, टाकाऊ वस्तूंचा योग्य वापर व कचऱ्याचे योग्य नियोजन करत आरोग्य कर्मचाऱ्यांना कामाबाबत सतत मार्गदर्शन केल्याने मागील दोन वर्षात झालेली पडझड सावरत थेट पहिल्या पाच क्रमांकांमध्ये राज्य व देश पातळीवर कामगिरी उंचावली आहे.

परिश्रमाचे यश

वरिष्ठ अधिकारी अधीक्षक अमन गुप्ता, आरोग्य निरीक्षक शिवराज चव्हाण, अतुल मुंडे, शाजेब सय्यद यांना केलेले मार्गदर्शन आणि शासकीय कंत्राटदार एन. एच. पटेल यांचे सुपरवायझर व कामगार यांनी परिश्रम घेतले. वेळोवेळी केलेल्या मार्गदर्शनासह आरोग्य कर्मचारी एन. एच. पटेल यांचे कंत्राटी कामगार व सुपरवायझर यांनी केलेल्या प्रामाणिक कामाची ही फलश्रुती आहे. या सर्वेक्षणात देवळाली कॅन्टोन्मेंट बोर्डाने ३१८५ गुण मिळवत राज्यात प्रथम तर देशात चौथे स्थान पटकावले आहे.

ABOUT THE AUTHOR

...view details