नाशिक - जिल्ह्यात कोरोनाचा प्रादुर्भाव कमी होत असून नव्याने आढळून येणाऱ्या रुग्णसंख्येत घट दिसून येत आहे. परिणामी कोरोनाबाधित रुग्णांचे मृत्यूचे प्रमाण देखील कमी झाल्याने स्मशानभूमीत मृतदेहावर अंत्यसंस्कारासाठी होणारी गर्दी ओसरली आहे.
नाशिक जिल्ह्यात मार्च, एप्रिल 2021 या महिन्यात कोरोनाच्या दुसऱ्या लाटेने हाहाकार माजवला होता. या काळात दिवसाला 5 ते 6 हजार नवीन बाधित रुग्ण आढळून येत असल्याने फक्त दोन महिन्यात कोरोना बाधितांचा आकडा एक लाखांच्या पुढे गेला होता. जिल्ह्यात रुग्णांना हॉस्पिटलमध्ये बेड मिळत नव्हते. ऑक्सिजन, रेमडेसिवीरचा तुटवडा निर्माण झाला होता. यासोबत शहरातील 17 स्मशानभूमीत अंत्यसंस्कारसाठी असलेले 80 बेड फुल होऊन नाईलाजाने मृतदेहावर जमिनीवर अंत्यसंस्कार करण्याची वेळ नातेवाइकांवर आली होती. जिथे 9 ते 10 अंत्यसंस्कारासाठी बेड होते. त्याठिकाणी रोज 40 ते 50 जणांवर अंत्यसंस्कार होत होते. मात्र आता कोरोना प्रादुर्भाव कमी होत असल्याने मृत्यूचे प्रमाण देखील कमी झाल्याने शहरातील स्मशानभूमीत सर्वसामान्य परिस्थिती निर्माण झाली आहे.
लाकडाचा प्रश्न मिटला -
कोरोनाचा प्रादुर्भाव कमी होताच नाशिकमध्ये अंत्यसंस्कारासाठी गर्दी ओसरली - नाशिक कोरोना रुग्णसंख्या
नाशिक जिल्ह्यात कोरोनाचा प्रादुर्भाव कमी होत असून नव्याने आढळून येणाऱ्या रुग्णसंख्येत घट दिसून येत आहे. परिणामी कोरोनाबाधित रुग्णांचे मृत्यूचे प्रमाण देखील कमी झाल्याने स्मशानभूमीत मृतदेहावर अंत्यसंस्कारासाठी होणारी गर्दी ओसरली आहे.
corona patient count decreased in nasik
कोरोनामुळे अचानक मार्च आणि एप्रिल महिन्यात कोरोनाबाधित मृत्यूचे प्रमाण वाढल्याने स्मशानभूमीतील यंत्रणेवर ताण आला होता. अशात अंत्यसंस्कार करण्यासाठी लागणाऱ्या लाकडाचा मोठा तुटवडा निर्माण झाला होता. अशात सामजिक बांधिलकीतून यशवंतराव मुक्त विद्यापीठाने त्याच्या आवारात असलेला लाकूडसाठा सीएसआर फंडातून महानगरपालिकेला दिल्याने शहरातील स्मशानभूमीतील लाकडाचा प्रश्न मिटला आहे.