नाशिक- जिल्ह्यात कोरोनाचा वाढता प्रार्दुभाव लक्षात घेता जिल्हा प्रशासनाने सायंकाळी सात वाजल्यानंतर अंशतः लॉकडाऊन लागू करण्याचा आदेश जारी केला आहे. जीवनावश्यक वस्तूंची दुकाने सोडून इतर दुकाने बंद करण्याचे करण्याचे आदेश काढण्यात आले आहेत. बुधवारपासून या नियमांची अंमलबजावणी करण्यात येणार असल्याचे जिल्हाधिकार्यांनी जाहीर केले होते. परंतु पहिल्याच दिवशी नागरिकांनी जिल्हाधिकार्यांच्या आदेशाला केराची टोपली दाखवल्याचा प्रकार दिसून आला, सायंकाळी साडेसातनंतरही शहरातील मुख्य बाजारपेठेतील दुकाने सुरूच असल्याचे चित्र दिसून आले.
बुधवारी सायंकाळी सात वाजेनंतर शहरातील सर्व दैनंदिन व्यवहार हे नेहमीप्रमाणे सुरू असल्याचे दिसून आली. शहरातील मुख्य बाजारपेठ असलेल्या भद्रकाली, गाडगे महाराज चौक, महात्मा गांधी मार्ग, मेनरोड, दहिपूल, शालीमार येथील सर्व दुकाने सायंकाळी उशिरापर्यंत सुरूच होती, त्यामुळे पालिका तसेच पोलीस प्रशासनानेही ही बाब गांभीर्याने घेतली नसल्याचेच दिसून येते. त्यामुळे पहिल्याच दिवशी लॉकडाऊनचा फज्जा उडाला असल्याचे चित्र होते.
कोरोनाचा उद्रेक-