महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / city

अखेर नाशिकमध्ये कोरोना टेस्टिंग सुरू, लॅबमध्ये पहिलाच रिपोर्ट निगेटिव्ह... - अखेर नाशिकमध्ये कोरोना टेस्टिंग सुरू, लॅबमध्ये पहिलाच रिपोर्ट निगेटिव्ह...

नाशिक जिल्ह्यात एकूण 181 कोरोनाबाधित रुग्ण असून एकट्या मालेगाव शहरात 159 कोरोनाचे रुग्ण आढळून आल्याने जिल्ह्यात चिंतेचे वातावरण आहे. नाशिक शहरात 11 तर नाशिक ग्रामीण परिसरात 11 असे जिल्ह्यातील रुग्णांची संख्या 181 जाऊन पोहोचली आहे. आता नाशिकमध्ये लॅब सुरू झाल्याने संशयिताचे रिपोर्ट लवकरात लवकर येऊन कोरोना बाधितांची वाढती संख्या आटोक्यात येण्यास मदत मिळणार आहे.

coraona-testing-lab-start-in-nashilk-first-report-is-negative
अखेर नाशिकमध्ये कोरोना टेस्टिंग सुरू, लॅबमध्ये पहिलाच रिपोर्ट निगेटिव्ह...

By

Published : Apr 28, 2020, 5:24 PM IST

नाशिक - नाशिकच्या आडगाव मेडिकल कॉलेजमध्ये सुरू करण्यात आलेल्या कोरोना तपासणी लॅबचे नाशिकचे पालकमंत्री छगंन भुजबळ याच्या हस्ते उद्घाटन करण्यात आले. लॅबमध्ये पहिलाच रिपोर्ट निगेटिव्ह आला आहे. नाशिक जिल्ह्यातील कोरोना रुग्णांची वाढती संख्या आणि धोका लक्षात घेत, नाशिकच्या आडगाव मेडिकल कॉलेजमध्ये कोरोना टेस्टिंग लॅब सुरू करण्यात आली आहे. या लॅब मध्ये पहिल्या टप्प्यात एकावेळी 180 तर दुसऱ्या टप्प्यात 350 नमुन्यांची तपासणी करण्याची व्यवस्था असल्याने याची प्रशासनाला मोठी मदत मिळणार आहे. या लॅबमध्ये तपासलेला पहिलाच रिपोर्ट निगेटिव्ह आल्याने प्रशासनाने सुटकेचा निश्वास सोडलाय.

अखेर नाशिकमध्ये कोरोना टेस्टिंग सुरू, लॅबमध्ये पहिलाच रिपोर्ट निगेटिव्ह...

नाशिक जिल्ह्यात एकूण 181 कोरोनाबाधित रुग्ण असून एकट्या मालेगाव शहरात 159 कोरोनाचे रुग्ण आढळून आल्याने जिल्ह्यात चिंतेचे वातावरण आहे. नाशिक शहरात 11 तर नाशिक ग्रामीण परिसरात 11 असे जिल्ह्यातील रुग्णांची संख्या 181 जाऊन पोहोचली आहे. आता नाशिकमध्ये लॅब सुरू झाल्याने संशयिताचे रिपोर्ट लवकरात लवकर येऊन कोरोना बाधितांची वाढती संख्या आटोक्यात येण्यास मदत मिळणार आहे.

नाशिकच्या डॉ.वसंतराव पवार मेडिकल कॉलेज येथे आज नाशिक जिल्ह्याचे पालकमंत्री ना.छगन भुजबळ यांच्या हस्ते कोरोना तपासणी लॅबचे उद्घाटन करण्यात आले. यावेळी मराठा विद्या प्रसारक समाज शैक्षणिक संस्थेच्या सरचिटणीस निलिमाताई पवार, विभागीय आयुक्त राजाराम माने, जिल्हाधिकारी सुरज मांढरे, मविप्र मेडिकल कॉलेजचे डॉक्टर, दातार लॅबचे प्रमुख आदी मान्यवर उपस्थित होते.नाशिकमध्ये सुरू झालेल्या या लॅबमुळे कमीत कमी वेळात अहवाल प्राप्त होणार आहे. यामुळे कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी नाशिकसह उत्तर महाराष्ट्रासाठी ही लॅब अत्यंत महत्वाची ठरेल असल्याचे भुजबळ यानी सांगितले.

For All Latest Updates

TAGGED:

ABOUT THE AUTHOR

...view details