मुंबई -राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे गेल्या दोन दिवसांपासून महाराष्ट्राच्या दौऱ्यावर आहेत. नाशिक जिल्ह्यातील मालेगाव, येवला, वैजापूर येथील कार्यक्रमानंतर मुख्यमंत्र्यांनी दिल्लीला जाण्याचा निर्णय घेतला. मुख्यमंत्री दिल्लीला जाण्याची ही सहावी वेळ आहे. दिल्लीमध्ये मुख्यमंत्री भाजपाच्या पक्षश्रेष्ठींची भेट घेणार असून, या बैठकीत मंत्रिमंडळ विस्ताराबाबत चर्चा होणार असल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे.
CM Eknath Shinde Delhi Tour : महाराष्ट्र दौरा अर्थवट सोडून मुख्यमंत्री शिंदे पुन्हा दिल्लीला रवाना; भाजप पक्षश्रेष्ठींची घेणार भेट - एकनाथ शिंदे दिल्ली दौरा
राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे गेल्या दोन दिवसांपासून महाराष्ट्राच्या दौऱ्यावर आहेत. नाशिक जिल्ह्यातील मालेगाव, येवला, वैजापूर येथील कार्यक्रमानंतर मुख्यमंत्र्यांनी दिल्लीला जाण्याचा निर्णय घेतला. मुख्यमंत्री दिल्लीला जाण्याची ही सहावी वेळ आहे.
मुख्यमंत्र्यांनी नाशिकमधील जनतेला विकासकामांबद्दल अस्वस्थ केल्यानंतर आता ते औरंगाबादमधील जनतेशी काय संवाद साधतात याकडे सर्वांचे लक्ष लागले होते. मात्र, मुख्यमंत्र्यांनी अचानक दिल्लीला जाण्याचा निर्णय घेतला आहे. यामुळे मुख्यमंत्र्यांचा हा दौरा अर्धा राहिला आहे. गेल्या काही दिवसांपासून राज्यातील मंत्रिमंडळाचा विस्तार रखडला असून आता तरी मंत्रिमंडळाचा विस्तार मार्गी लागेल का याकडे सगळ्यांचे लक्ष लागून राहिले आहे.
६५-३५ चा फॉर्मुला? -मंत्रिमंडळामध्ये 42 सदस्य असणार आहेत. शिंदे गटाच्या आमदारांची सदस्य संख्या आणि भाजपाच्या आमदारांची सदस्य संख्या पाहता दोन्ही गट मिळून 65 --35 असा फॉर्म्युला ठरला आहे. यानुसार शिंदे गटाला तेरा मंत्रिपदे तर भाजपाला 29 मंत्रिपदे मिळण्याची शक्यता आहे.