नाशिक -शिवसेना नेते संजय राऊत काठावर वाचले, नाही तर आणखी उलट झाले असते. संजय पवार निवडून आले असते आणि संजय राऊत मागे राहिले असते, अशी प्रतिक्रिया छगन भुजबळ ( Chhagan Bhujbal comment on sanjay raut ) यांनी राज्यसभा निवडणूक निकालानंतर नाशिकमध्ये दिली आहे.
प्रतिक्रिया देताना मंत्री छगन भुजबळ हेही वाचा -Terrible Accident on Borgaon-Saputara Highway : लक्झरी बस आणि पिकपचा भीषण अपघात; तीन ठार, पाच जखमी
राज्यसभा निवडणुकीत संजय राऊत यांचा विजय -नुकतीच राज्यसभेची निवडणूक होऊन गेली. यात महाराष्ट्रातून 6 व्यक्ती राज्यसभेवर जाणार होती. 6 जागांपैकी 1 जागा शिवसेना सहज जिंकून आणू शकत होती. या जागेसाठी शिवसेनेकडे आवश्यक मते होती. शिवसेनेने परत संजय राऊत यांना संधी दिली. तसेच अतिरिक्त एका जागेवर कोल्हापूरचे शिवसेनेचे जिल्हाध्यक्ष संजय पवार यांना संधी दिली. 10 जूनला निवडणूक झाली. यात संजय राऊत यांचा विजय झाला. त्यांना 41 मते मिळाली तर संजय पवार यांचा पराभव झाला. निवडणुकीत शिवसेनेकडे संजय राऊत यांच्यासाठी अपेक्षित मतदान असल्याने त्यांना निवडून जाण्यासाठी अडथळा नव्हता. शिवसेनेच्या ४२ आमदारांनी पहिल्या पसंतीचे मत राऊत यांना टाकले आणि ते विजयी झाले.
हेही वाचा -Tree fell on a rickshaw in Nashik : नाशिकात रिक्षावर झाड पडले; रिक्षा चालकासह प्रवाशी महिलेचा मृत्यू