नाशिक- देशात छुप्या पद्धतीने घातपाती कारवाया केल्याबद्दल स्टुडंट इस्लामिक मूव्हमेंट ऑफ इंडिया (सिमी) संघटनेवरील बंदी आणखीन ५ वर्षांनी वाढवण्यात आली आहे. देशाला धोका असल्याने बंदीचा हा कालावधी वाढवण्यात आल्याचे केंद्रीय गृहमंत्रालयाने स्पष्ट केले आहे.
सिमीमुळे देशात समता आणि एकात्मतेला बाधा निर्माण होऊ शकते. त्यामुळे या संघटनेवरील बंदी आणखी ५ वर्षाने वाढवण्यात येत असल्याचे केंद्रीय गृहमंत्रालयाने राजपत्र काढून स्पष्ट केले आहे. सिमीवरील बंदीचा कालावधी ३१ जानेवारी २०१९ रोजी संपला होता. बंदीच्या कालावधी वाढवण्याबाबत सरकारने सर्व राज्यांकडून मते मागविली होती. १५ राज्य आणि केंद्रशासित प्रदेशांनी सिमीवर बंदी घालण्याचे मत नोंदवले होते.