महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / city

MNS Lady Worker Bullying In Nashik : नाशिकमध्ये मनसे महिला पदाधिकाऱ्याची दादागिरी, बांधकाम व्यावसायिकाला मारहाण - पंचवटी पोलीस ठाणे

नाशिकमध्ये मनसेच्या महिला पदाधिकाऱ्याची दादागिरी समोर आली ( MNS Lady Worker Bullying In Nashik ) आहे. धूळ उडत असल्याच्या कारणावरून महिला पदाधिकाऱ्याने एका बांधकाम व्यावसायिकास शिवीगाळ करत मारहाण केली. याबाबत पोलीस ठाण्यात ( Panchawati Police Station ) गुन्हा दाखल करण्यात आला ( FIR Registered Against MNS Lady Worker ) आहे.

नाशिकमध्ये मनसे महिला पदाधिकाऱ्याची दादागिरी
नाशिकमध्ये मनसे महिला पदाधिकाऱ्याची दादागिरी

By

Published : Jan 12, 2022, 5:09 AM IST

नाशिक - नाशिकमध्ये एका बांधकाम व्यावसायिकाला मनसे पदाधिकारी असलेल्या महिलेकडून मारहाण करण्यात आली ( MNS Lady Worker Bullying In Nashik ) आहे. बांधकाम सुरू असलेल्या ठिकाणाची धूळ उडत असल्याच्या किरकोळ कारणावरून बांधकाम व्यावसायिक आणि मनसेच्या महिला पदाधिकारी यांच्या कुटुंबीयांमध्ये वाद झाला. या वादानंतर मनसेच्या महिला पदाधिकाऱ्याने शिवराळ भाषा वापरून बांधकाम व्यसायिकाला मारहाण केली. याप्रकरणी पंचवटी पोलीस ठाण्यात ( Panchawati Police Station ) गुन्हा दाखल करण्यात आला ( FIR Registered Against MNS Lady Worker ) आहे.

नाशिकमध्ये मनसे महिला पदाधिकाऱ्याची दादागिरी, बांधकाम व्यावसायिकाला मारहाण

पोलीस ठाण्यात महिलेविरोधात तक्रार

नाशिकच्या पंचवटी परिसरात एका बांधकाम व्यावसायिकाला मनसेच्या महिला पदाधिकाऱ्याने शिवीगाळ करत मारहाण केल्याचा प्रकार समोर आला आहे. जयेश काठे या बांधकाम व्यावसायिकाच्या तक्रारीनंतर मनसेच्या पंचवटी विभाग अध्यक्ष अक्षरा घोडके विरोधात पंचवटी पोलीस ठाण्यात तक्रारही दाखल करण्यात आली आहे. दरम्यान या मारहाणीच्या घटनेचा व्हिडीओदेखील समोर आलाय.

बांधकामाची धूळ उडत असल्याचे कारण

बांधकाम साईडवरील धूळ उडत असल्याच्या किरकोळ कारणाहून मनसेच्या महिला पदाधिकाऱ्याने आपल्याला मारहाण केली असून, पोलीस आणि मनसेच्या वरिष्ठांनी या महिलेवर कारवाई करावी अशी मागणी या बांधकाम व्यावसायिकाने केली आहे. तर या प्रकरणात ज्यांच्यावर गुन्हा दाखल झालाय त्या मनसेच्या पदाधिकारी अक्षरा घोडके यांनीदेखील संबंधित बांधकाम व्यवसायिकाने आपल्याला धक्काबुक्की आणि शिवीगाळ केल्याचा आरोप केला आहे. हा सर्व प्रकार दि.९ जानेवारी रोजी घडला असून, दि. १० जानेवारी पंचवटी पोलीस स्टेशन येथे तक्रार दाखल झाली आहे.

वरिष्ठांनी लक्ष घालावे

मसनेच्या महिला पदाधिकाऱ्याच्या या भाईगिरीवर बांधकाम व्यवसायिकाने नाराजी व्यक्त केली आहे. तर मनसेच्या वरिष्ठ पदाधिकाऱ्यांनी यात लक्ष घालण्याची गरज आहे. महिला पदाधिकाऱ्याची ही अर्वाच्च शिवीगाळ आणि भाईगिरी मनसेच्या प्रतिमेला नक्कीच डागाळणारी आहे.

ABOUT THE AUTHOR

...view details