नाशिक - पेठ तालुक्यात मागील काही दिवसांपासून एक विचित्र प्रकार घडत आहे. पेठच्या निरगुडे गावालगत जमिनीत अचानक बुडबुडे निघत आहेत. यासोबतच काही विचित्र आवाजासोबत जमिनीला मध्येच हादरेही बसत आहेत. याप्रकारांमुळे गावकऱ्यांमध्ये भितीचे वातावरण पसरले आहे.
नाशिक : जमिनीतून पाण्याच्या बुडबुड्यांसह येतोय विचित्र आवाज; नागरिकांमध्ये घबराट
गोंदे आणि भायगाव भूकंपप्रवण क्षेत्राजवळच असल्याने ग्रामस्थांना भीती वाटत आहे.
जिल्हा प्रशासनाला माहिती मिळताच तहसीलदार हरेष भामरे यांनी घटनास्थळाची पाहणी केली. बुडबुडे हवेचे आहेत. परंतु, हे बुडबुडे भूगर्भातील वाफेचे नाहीत. याचा अहवाल मेरीच्या भुगर्भीय नियंत्रण कक्षास देण्यात आला आहे. यासोबतच नागरिकांनी याप्रकाराची भिती बाळगू नये, असे आवाहन तहसीलदार हरेष भामरे यांनी केले आहे.
गोंदे आणि भायगाव भूकंपप्रवण क्षेत्राजवळच असल्याने ग्रामस्थांना भीती वाटत आहे. तर, यापूर्वीही गावालगत असलेल्या दमणगंगा नदीवरील आमडोहातून विचित्र आवाज येत होते, अशी प्रतिक्रिया ग्रामस्थांनी दिली आहे.