महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / city

Rain In Trimbakeshwar : 'पुर आला धावून, पुलाचे साहित्य गेले वाहून'; त्र्यंबकेश्वर तालुक्याच्या शिरसगावमधली घटना

त्र्यंबकेश्वर तालुक्यात लहान मोठ्या प्रवाहांनी रौद्ररूप घेतले आहे. परिणामी अनेक नद्यांना पूर ( Rivers Flood ) आला असून शिरसगाव येथे नव्याने उभारण्यात आलेल्या पुलाचे बांधकाम साहित्य पुराच्या प्रवाहात वाहून गेले आहे. त्यामुळे स्लॅब देखील कोसळण्याची शक्यता परिसरातल्या नागरिकांकडून व्यक्त होत आहे.

Rain In Trimbakeshwar
त्र्यंबकेश्वरमध्ये पाऊस

By

Published : Jul 9, 2022, 2:54 PM IST

नाशिक -नाशिकच्या त्र्यंबकेश्वरसह तालुक्याच्या ग्रामीण भागातील हरसूल परिसरात पावसाची संततधार सुरू ( Rains In Nashik ) असल्याने जनजीवन विस्कळीत ( Public Life Disrupt ) झाले आहे. या पावसाने अनेक नद्यांना पूर आला ( Rivers Flooded ) असून शिरसगाव येथे नव्याने उभारण्यात आलेल्या पुलाचे बांधकाम साहित्य पुराच्या प्रवाहात वाहून गेले ( Bridge Construction Materials Washed Away ) आहे. त्यामुळे स्लॅब देखील कोसळण्याची शक्यता परिसरातल्या नागरिकांकडून व्यक्त होत आहे.

त्र्यंबकेश्वरमध्ये पाऊस

पावसाने शेतकऱ्याला दिलासा -त्र्यंबकेश्वर तालुक्यात काल सकाळपासूनच संततधार ( Rain In Trimbakeshwar ) सुरू असल्याने काही तासांतच अनेक लहान मोठ्या प्रवाहांनी रौद्ररूप घेतले आहे. ओहळ, नाले, नद्यांना पूर आला आहे. पूरस्थिती निर्माण झाल्यास काय करावे अशा चिंता स्थानिकांकडून व्यक्त करण्यात येत आहेत.

भात कामांना वेग -मात्र या पावसाने शेतकऱ्याला दिलासा मिळाला असून शेतकरी या संततधार पावसात भात अवनी करत आहे. या पावसामुळे शाळकरी मुले, शिक्षक वर्गाची पुरती तारांबळ उडाल्याचे चित्र पहावयास मिळाले. तसेच अनेक गावांचा संपर्क तुटल्याने विद्यार्थ्यांवर मोठी कसरत करण्याची वेळ आली. त्यात हवा आणि जोरदार पाऊस होत असल्याने मानवी जीवनावरही याचा परिणाम दिसून आला आहे. धो- धो बरसणाऱ्या पावसाने पूर्णतः जनजीवन विस्कळीत झाले आहे.

बांधकाम साहित्य वाहून गेले -मुरंबी रस्त्यावर नव्याने पुलाची उभारणी करण्यात येत आहेत. मागील आठवड्यात या पुलावर काही भागात स्लॅब टाकण्यात आला होता. तर काही ठिकाणी अजून स्लॅब टाकण्याची तयारी सुरू आहे. मात्र हा पूल नदीच्या पात्रात आहे. यामुळे संततधार पावसामुळे नदीला पूर आल्याने बांधकाम साहित्य वाहून गेले आहे. यामुळे सर आली धावून, बांधकाम साहित्य गेले वाहून अशी म्हणायची वेळ आली आहे.

पूल दळणवळणाच्या दृष्टीने महत्त्वाचा - शिरसगाव भागात दळणवळणाच्या दृष्टीने नव्याने उभारण्यात येत असलेला हा महत्वाचा पूल आहे. अनेक गावांना जोडणारा आणि वेळेची बचत करणारा हा पूल आहे. मात्र अधिकारी आणि ठेकेदार यांच्या आडमुठ्या धोरणामुळे भर पावसाळ्यात या पुलाचे काम करण्यात येत असल्याने नियंत्रण व गुणवत्तापूर्ण असेल का ? संततधार पावसाने या पुलाचे बांधकाम करण्यात येणारे साहित्य वाहून गेले आहे. तसेच या नदीतून मोठ्या प्रमाणात पाणी वाहत असते. यामुळे ग्रामस्थांना बाहेर गावी जाण्यासाठी आणि विद्यार्थ्यांना शाळेत जाण्यासाठी अडचण येत आहे. कामाची गुणवत्ता व हलगर्जीपणा याबाबत सखोल चौकशी करून दोषींवर कारवाई करण्यात यावी अशी मागणी परिसरातून होत आहे.

पावसामुळे जिल्ह्यातील धरणसाठ्यात वाढ -नाशिकशहरासह तालुक्यात कालपासून सुरू असलेल्या पावसामुळे जिल्ह्यातील धरणसाठ्यात वाढ झाली आहे.
गंगापूर धरण 37 टक्के तर दारणा धारण 44 टक्के भरल्याने मोठा दिलासा मिळाला आहे. तर इगतपुरी,त्र्यंबकेश्वर आणि नाशिक तालुक्यामध्ये सर्वाधिक पावसाची नोंद झाली आहे. त्र्यंबकेश्वरमध्ये 92 मिलीमीटर, इगतपुरीमध्ये 93 मिलीमीटर तर नाशिकमध्ये 60 मिलिमीटर पावसाची नोंद झाली आहे. पावसाचे पुनरागमन झाले असले तरी, जिल्ह्यातील काही ग्रामीण भागात अजून काही ठिकाणी मुसळधार पावसाची प्रतीक्षा कायम आहे.

हेही वाचा -Maharashtra Politics : आगामी निवडणुकीची धाकधूक, बंडखोरांचे समर्थन, इच्छुकांची वाढली डोकेदुखी

ABOUT THE AUTHOR

...view details