नाशिक -जिल्ह्यातील दिंडोरी तालुक्यातील राजाराम नगर येथील कादवा सहकारी साखर कारखान्याच्या 43 व्या गळीत हंगामाचा बॉयलर प्रदीपन समारंभ मोठ्या उत्साहात संपन्न झाला. यावेळी बॉयलर अग्नीप्रदिपन पूजन दत्तात्रय देशमुख, त्यांच्या पत्नी व भिकन कोंड आणि त्यांच्या पत्नींच्या हस्ते करण्यात आले. यावेळी कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी चेअरमन श्रीराम शेटे हे होते.
दिंडोरीतील कादवा सहकारी साखर कारखान्यात बॉयलर अग्नीप्रदिपन समारंभ हेही वाचा... अवैध्य गुटखा वाहतूकीवर कासार पोलिसांची धाड, 16 लाख रुपये किमतीचा मुद्देमाल जप्त
यावेळी बोलताना श्रीराम शेटे म्हणाले की, कादवा कारखाना उत्तर महाराष्ट्रात सर्वाधिक एफआरपी देणारा कारखाना असल्याने कादवा कारखान्यास ऊस देण्यास जिल्यातील ऊस उत्पादक पसंती देतात. मात्र कादवा कारखान्याचे विविध मशिनरी जुन्या झाल्याने व क्षमता कमी असल्याचे पुरेसे गाळप करणे शक्य होत नव्हते. त्यामुळे कादवा कारखान्याने आता विविध मशिनरी अधिक गाळप क्षमतेच्या टाकल्या आहे. नव्याने मिल, बॉयलर, टर्बाईन, पॅन चिमणी, ऑलिव्हर, क्रिस्टलायझर, व्हेपरसेल, शुगर ग्रेडर आदी नव्याने टाकण्यात आल्या आहे. त्यामुळे यावर्षी कारखाण्यात अधिक क्षमतेने गाळप होणे शक्य होणार असून जास्तीत जास्त गाळप करण्याचे उद्दिष्ट आहे. तसेच भविष्यात इथेनॉल प्रकल्प करायचे असून ती काळाची गरज आहे. त्यासाठी शेतकऱ्यांनी जास्तीत जास्त ऊस लागवड करावे, असे आवाहन श्रीराम शेटे यांनी केले.
हेही वाचा... राष्ट्रवादीने मंगळवारी बोलावली आमदारांची बैठक; राजकीय घडामोडींना वेग