महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / city

BJP Corporator Murder Case : भुसावळ हत्याकांड, मुख्य संशयित पोलिसांच्या ताब्यात - BJP Corporator

जळगाव जिल्ह्यातील भुसावळ येथील भाजपचे नगरसेवक रवींद्र खरात यांच्या कुटुंबावर 2019 साली हल्ला झाला ( BJP Corporator Murder Case ) होता. त्यात नगरसेवक खरात, त्यांचे भाऊ, दोन मुले व अन्य एक, अशा पाच जणांचाप मृत्यू झाला होता. घटनेनंतर मुख्य संशयित पोलिसांना गुंगारा देत होता. मात्र, नाशिक पोलिसांनी ( Nashik Police ) शुक्रवारी रात्री त्याच्या मुसक्या आवळल्या आहेत. अरबाज खान उर्फ गोलू खान, असे त्या मुख्य संशयित आरोपीचे नाव आहे.

भुसावळ हत्याकांड
भुसावळ हत्याकांड

By

Published : Mar 5, 2022, 3:39 PM IST

Updated : Mar 5, 2022, 4:31 PM IST

नाशिक- राज्याला हदरवून साेडणाऱ्या भुसावळ ( जि. जळगाव ) येथील पाच जणांच्या हत्येप्रकरणातील ( BJP Corporator Murder Case ) फरारी प्रमुख संशयिताला नाशिक राेड पाेलिसांनी अखेर अटक केली आहे. अरबाज अजगर खान ऊर्फ गोलू खान, असे अटकेत असलेल्या संशयिताचे नाव आहे. ताे अडीच वर्षांपासून पाेलिसांसह सीआयडीच्या हातावर तुरी देत हाेता.

माहिती देताना वरिष्ठ पोलीस निरीक्षक

गुन्ह्याचा तपास मुंबई सीआयडीकडे वर्ग करण्यात आला होता -भाजपचे नगरसेवक रवींद्र खरात उर्फ हंप्या यांच्या कुटुंबावर 6 ऑक्टाेबर, 2019 राेजी हल्लेखोरांनी अंदाधुंद गोळीबार केला हाेता. या हल्ल्यात त्यांचे भाऊ सुनील बाबूराव खरात (वय 55 वर्षे) व स्वत: रवींद्र बाबूराव खरात (वय 50 वर्षे), मुलगा सागर रवींद्र खरात (वय 24 वर्षे), रोहीत उर्फ सोनू रवींद्र खरात ( वय 20 वर्षे) व सुमित गजरे या पाच जणांचा मृत्यू झाला हाेता. तसेच या हल्ल्यात इतर चारजण गंभीर जखमी झाले हाेते. या धक्कादायक घटनेमुळे भुसावळ शहर हादरून गेले हाेते. या गुन्ह्याचा तपास मुंबई सीआयडीकडे वर्ग करण्यात आला होता. तेव्हापासून यातील प्रमुख अरबाज अजगर खान ऊर्फ गोलू खान हा फरार होता. त्यामुळे पोलिसांपुढे या संशयित गुन्हेगारास पकडण्याचे मोठे आव्हान होते.

पुढील चौकशीसाठी सीआयडीच्या ताब्यात दिले -शुक्रवारी ( दि.4 मार्च ) संशयित अरबाज खान उर्फ गोलू हा जेलरोड परिसरात फिरत असल्याची माहिती नाशिक रोड पोलीस ठाण्याच्या गुन्हे शोध पथकाला मिळाली. वरिष्ठ पोलीस निरीक्षक अनिक शिंदे यांना याबाबत पथकाने ( Nashik Police ) कळवले. त्यानंतर परिसरात सापळा रचण्यात आला. मात्र, अरबाजला याची कुणकुण लागल्याने तो पळून जाण्याचा प्रयत्न करू लागला. मात्र, पोलिसांनी त्याला शिताफीने ताब्यात घेतले. नाशिक रोड पोलिसांनी कायदेशीर बाबी पूर्ण करत पुढील तपासासाठी अरबाजला सीआयडीच्या ताब्यात दिले आहे.

हेही वाचा -Nashik Accidental Death : रुग्णालयातील लिफ्टच्या खड्ड्यात पडून तरुणाचा मृत्यू

Last Updated : Mar 5, 2022, 4:31 PM IST

ABOUT THE AUTHOR

...view details