नाशिक- शहरातील भारत नगर भागातील नासारडी नदीच्या बाजूला एका कचराकुंडीत प्लास्टिकच्या पिशवीत स्त्री जातीचे अर्भक फेकून देण्यात आले होते. रक्ताने माखलेल्या या अर्भकाला शिक्षिका मंदा शिंदे यांनी पाहिले आणि उपचारासाठी जिल्हा शासकीय रुग्णालयात एमआयसीयूत दाखल केले. या ठिकाणी परिचारिका या अर्भकाचा आईप्रमाणे सांभाळ करत आहेत.
कचराकुंडीत फेकून दिले स्त्री जातीचे अर्भक; रुग्णालयाच्या परिचारिका आईप्रमाणे करत आहेत सांभाळ - baby child
नासारडी नदीच्या बाजूला एका कचराकुंडीत प्लास्टिकच्या पिशवीत स्त्री जातीचे अर्भक फेकून देण्यात आले होते. अनाथ गोंडस मुलीचा येथील परिचारिका आईप्रमाणे सांभाळ करत असून त्यांना ह्या मुलीचा लळा लागला आहे.
पोलिसांनी या नवजात अर्भकला उपचारासाठी जिल्हा शासकीय रुग्णालयाच्या एमआयसीयू कक्षात दाखल केले आहे. अर्भक रुग्णालयात दाखल झाले तेव्हा ते रक्ताने माखले होते. अर्भकावर योग्य पद्धतीने उपचार सुरू असून आता प्रकृती स्थिर असल्याचे डॉक्टरांनी सांगितले. हॉस्पिटलमधील डॉ. पंकज गाजरे, डॉ. कृष्णा पवार, डॉ. नरेंद्र बागुल, डॉ. श्रेयस पटेल, डॉ. दिनेश ठाकूर, परिचारिका वर्षा वामोरकर, काळे मॅडम, नीलिमा ठाकूर, श्रद्धा पाटील हे अर्भकाची काळजी घेत आहेत.
पुढील २ दिवसांनंतर अर्भकाला अशोक स्तंभ येथील अनाथ आश्रमात पाठवण्यात येणार असल्याचे डॉक्टरांनी सांगितले. अनाथ गोंडस मुलीचा येथील परिचारिका आईप्रमाणे सांभाळ करत असून त्यांना ह्या मुलीचा लळा लागला आहे. मुलगी नको म्हणून? की अनैतिक संबंधातून ह्या नवजात अर्भकाला फेकून देण्यात आले, ह्याचा शोध मुंबई नाका पोलीस घेत आहे.