नाशिक - कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी सरकारने संपूर्ण देशात लॉकडाऊन लागू केला आहे. राज्य सरकारनेदेखील जिल्हा बंदी केली आहे. याचा परिमाण वाहतूक व्यवसायावर झाला आहे. त्यामुळे एकट्या नाशिक शहरात महाराष्ट्र राज्यासोबतच अन्य राज्यातून आलेले जवळपास 400 ते 500 ट्रक अडकून पडले आहेत.
काही दिवसांपूर्वी ट्रकचा हा आकडा 700 ते 800 इतका होता. मात्र, अत्यावश्यक सेवा देण्यासाठी अनेक ट्रक शहराच्या बाहेर गेले आहेत. तरीही अद्याप मोठ्या प्रमाणात ट्रक आणि त्याचे चालक नाशिकमध्ये आहे. मागील अनेक दिवसांपासून शहरात अडकून पडल्याने ट्रक चालक आणी त्यांच्यासोबतच्या सहकाऱ्यांना नाशिक ट्रान्सपोर्ट असोसिएशन, नाशिक गुड्स ट्रान्सपोर्ट असोसिएशन आणि विविध समाजसेवी संस्था, संघटनांकडून जेवण दिले जात आहे.