महाराष्ट्र

maharashtra

निसर्ग चक्रीवादळ; नाशिकमध्ये मुसळधार पाऊस, शहराची बत्ती गूल

By

Published : Jun 4, 2020, 3:43 AM IST

Updated : Jun 4, 2020, 6:10 AM IST

नाशिक जिल्ह्यात व शहरात ‘निसर्ग’ वादळामुळे वीजयंत्रणेवर मोठा परिमाण झाला आहे. झाडाच्या फांद्या वीजवाहक तारांवर पडल्याने व वार्‍यामुळे वीजवाहक तारा तुटल्याने वीजपुरवठा बाधित झाला.

Chue
संग्रहित छायाचित्र

नाशिक- निसर्ग चक्रीवादळाचा फटका कोकण, पुण्याबरोबर नाशिकलाही बसला असून 2 जूनच्या मध्यरात्रीपासून नाशिक जिल्ह्यात पावसाची संततधार सुरू होती. 3 जून रोजी संध्याकाळपासून पावसाचा जोर वाढला आहे. नाशिक शहरासह जिल्ह्यातील अनेक भागात मुसळधार पाऊस सुरू आहे. हवामान विभागाने देखील 3 आणि 4 जून रोजी नाशिकसह उत्तर महाराष्ट्रात जोरदार पाऊस होण्याचा अंदाज वर्तवला आहे.

निसर्ग चक्रीवादळ; नाशिकमध्ये मुसळधार पाऊस, शहराची बत्ती गूल

निसर्ग चक्रीवादळाचा परिणाम नाशिक जिल्ह्यात देखील दिसून आला. 3 मे रोजी संध्याकाळपासून नाशिक शहरासह जिल्ह्यात जोरदार पाऊस पडत असून जनजीवन विस्कळीत झाले आहे. शहरातील काही भागात वृक्षाच्या फांद्या रस्त्यावर पडल्याच्या घटना घडल्या. तर नाशिक शहरात खबरदारीचा उपाय म्हणून महावितरणने उपकेंद्रांचा वीजपुरवठा बंद केला.

या वीज बंदमुळे सुद्धा ग्राहकांचा वीजपुरवठा बाधित झाला आहे. उन्हाळ्यातील वाढत्या तापमानामुळे वीजवाहक यंत्रणेवर बसविण्यात आलेल्या पिन इन्सुलेटर आणि डिस्क इन्सुलेटरवर पहिल्याच पावसाचे पाणी पडल्याने ते पंक्चर होऊन वीजपुरवठा बाधित झाला आहे. याशिवाय झाडाच्या फांद्या वीजवाहक तारांवर पडल्याने व वार्‍यामुळे वीजवाहक तारा तुटल्याने वीजपुरवठा बाधित झाला. नाशिक जिल्ह्यात व शहरात ‘निसर्ग’ वादळामुळे वीजयंत्रणेवर मोठा परिमाण झाला आहे. वादळामुळे जिल्ह्यात महावितरणची मोठी हानी होण्याची शक्यता आहे.

या परिस्थितीवर मात करण्यासाठी यंत्रणा सज्ज ठेवली आहे. हळुहळु सर्व संपुर्ण शहराचा वीजपुरवठा सुरू करण्यात येईल. याकाळात नागरिकांनी सहकार्य करावे. वादळाच्या तीव्रतेवर होणारे नुकसान अवलंबून असणार आहे. त्यानूसार विद्युत पुरवठा पूर्ववत करण्याचा प्राधान्यक्रम ठरवला जाईल. अती उच्च दाब वाहिन्या सर्वप्रथम सुरू केल्या जातील. त्यानंतर उपकेंद्र सुरू केली जातील. त्यानंतर टप्प्याटप्प्याने उच्चदाब वाहिन्या व लघुदाब वाहिन्या सुरू केल्या जातील. नागरिकांनी या काळात सहकार्य करावे असे आवाहन महावितरणचे अधिक्षक अभियंता प्रवीण दरोली यांनी केले आहे.

Last Updated : Jun 4, 2020, 6:10 AM IST

ABOUT THE AUTHOR

...view details