महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / city

नाशिकमध्ये एसटी-रिक्षाचा विचित्र अपघात! दोन्ही वाहने विहिरीत कोसळल्याने 26 ठार

मालेगावहून देवळा येथे जाणारी एसटी बस आणि रिक्षा यांच्यात विचित्र अपघात झाला. यात रिक्षासहित बस विहिरीत कोसळल्याने 26 प्रवासी ठार तर 32 जण जखमी झाले आहेत. जखमींना देवळा, मालेगाव, चांदवड येथील शासकीय रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.

st bus accident
नाशिक एसटी बस अपघात

By

Published : Jan 28, 2020, 5:28 PM IST

Updated : Feb 9, 2020, 4:27 PM IST

नाशिक -मालेगावहून देवळा येथे जाणारी एसटी बस आणि रिक्षा यांच्यात विचित्र अपघात झाला. यात रिक्षासहित बस विहिरीत कोसळल्याने 26 प्रवासी ठार, तर 32 जण जखमी झाले आहेत. अपघातात सर्वप्रथम रिक्षा विहिरीत पडली, त्या पाठोपाठ एसटी बस विहिरीत कोसळली. सर्व जखमींना देवळा, मालेगाव, चांदवड येथील शासकीय रुग्णालयात दाखल करण्यात आले असून त्यांच्यावर उपचार सुरू आहेत.

नाशिकमध्ये एसटी-रिक्षाचा विचित्र अपघात

मृतांच्या नातेवाईकांना 10 लाखांची मदत -

या भीषण अपघातात मृत्यू झालेल्यांच्या नातेवाईकांना 10 लाख रुपये मदतीची परिवहन मंत्री अनिल परब यांची माहिती.

कळवण येथील डेपोतील एसटी बस आणि अ‌ॅपे रिक्षा यांच्यात हा अपघात झाला. या अपघातात बस आणि रिक्षा थेट विहिरीत कोसळली आहे. यानंतर अग्निशमन दल आणि पोलीस घटनास्थळी पोहोचले आणि गावकऱ्यांच्या सहाय्याने मदतकार्य सुरू केले.

नाशिकमध्ये एसटी आणि रिक्षा यांच्यात विचित्र अपघात... रिक्षासहित बस विहरीत कोसळली

हेही वाचा... भावी आयुष्याचे स्वप्न रंगवतानाचा काळाची झडप, साखरपुड्याच्या दिवशीच निघाली 'त्याची' अंत्ययात्रा

मालेगाव येथून धोबीघाट मेशीकडे जात असताना या एसटी बसला अपघात झाला. कळवण डेपोची उमराणे-देवळा ही बस आणि अ‌ॅपे रिक्षा यांची जोराची धडक झाली. बसचे टायर फुटल्यामुळे बसने रिक्षाला धडक दिली. ही धडक इतकी भीषण होती की, अपघातानंतर बस रिक्षासहीत विहिरीत कोसळली. प्रथम रिक्षा विहरीत कोसळल्याने रिक्षातील सर्व 9 प्रवासी मृत्यूमुखी पडले. धोबीघाटजवळील देश-विदेश हॉटेलजवळ हा अपघात झाला.

हेही वाचा... व्हिडिओ : मसूरीच्या घाटात चारचाकी आणि दुचाकीची समोरासमोर धडक

एसटीतील मृत्यूमुखी पडलेल्या व्यक्तींची नावे :

राज्य महामार्ग बस क्रमांक - एम.एच. 06 एस -8428

  1. कल्पना योगेश वन्से (रा. निंबायती निमगाव)
  2. शिवाजी रूपला गावित (रा. कळवण)
  3. चंद्रभागाबाई उगले (रा. सरस्वतीवाडी)
  4. अंकुश संपत निकम (रा. वाखारवाडी)
  5. अलका दिगंबर मोरे (रा. खर्डे)
  6. शितल अमोल अहिरे (रा. नामपूर)
  7. रघुनाथ मेतकत (रा. देवळा)
  8. प्रकाश बच्छाव (बस चालक )
  9. शांताराम चिंधा निकम (रा. डोंगरगाव)

(तीन मृतदेहांची ओळख पटलेली नाही)

रिक्षातील मृत्यूमखी पडलेल्या व्यक्तींची नावे ;

अ‌ॅपे रिक्षा क्रमांक एम.एच. 15 डी.सी. 4233

  1. अजीज नथु मन्सुरी (61, रा. येसगाव)
  2. हजराबाई अजीज मन्सुरी (55, रा. येसगाव)
  3. अन्सारभाई मन्सुरी (41, रा. सटाणा)
  4. शाहीस्ता शकीन मन्सुरी (35, रा. मुंबई)
  5. शाहीन अन्सारभाई मन्सुरी (32, रा. सटाणा)
  6. जावेद अन्सरभाई मन्सुरी (11, रा. येसगाव)
  7. कुरबान दादाभाई मन्सुरी (61, रा. करंजगव्हाण)
  8. ज्ञानेश्वर शांतीलाल सुर्यवंशी (25, रा. येसगाव)
  9. फारुख भिकन मन्सुरी (55, रा. करंजगव्हाण)
Last Updated : Feb 9, 2020, 4:27 PM IST

ABOUT THE AUTHOR

...view details