नाशिक - सातपूर भागामध्ये गोळ्या झाडलेल्या अवस्थेत तरुणाचा मृतदेह आढळून आल्याने शहरात भीतीचे वातावरण पसरले आहे. रोहित नागरे असे या मृत तरुणाचे नाव असून त्याने स्वतःवर गोळी झाडून घेत आत्महत्या केली असावी असा प्राथमिक अंदाज पोलिसांनी वर्तविला आहे.
नाशकात आढळला तरुणाचा मृतदेह, पिस्तूल सापडल्याने हत्या की आत्महत्या गुढ कायम - nashik satpur area dead body found news
सातपूर औद्योगिक वसाहतीत असलेल्या एबीबी कंपनीच्या पाठीमागील बाजूस एका तरुणाचा मृतदेह असल्याची माहिती मिळताच सातपूर पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस अधिकारी तसेच गुन्हे शाखेच्या पथकाने घटनास्थळी धाव घेत पंचनामा करून मृतदेह शवविच्छेदनासाठी हलवला आहे.
मृतदेहा शेजारीच पिस्तूल आढळल्याने हत्या की आत्महत्या गुढ कायम...
मैत्रिणी सोबत असताना हटकल्याच्या कारणावरून दोघांनी एकाची हत्या केल्याची घटना ताजी असताना नाशिकच्या सातपूर औद्योगिक वसाहतीत तरुणाचा गोळ्या झाडलेल्या अवस्थेतील मृतदेह आढळून आल्याने खळबळ उडाली आहे. सातपूर औद्योगिक वसाहतीत असलेल्या एबीबी कंपनीच्या पाठीमागील बाजूस एका तरुणाचा मृतदेह असल्याची माहिती मिळताच सातपूर पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस अधिकारी तसेच गुन्हे शाखेच्या पथकाने घटनास्थळी धाव घेत पंचनामा करून मृतदेह शवविच्छेदनासाठी हलवला आहे. दरम्यान ही आत्महत्या असल्याचा प्राथमिक अंदाज पोलिसांनी वर्तवला आहे.
अवघ्या चार दिवसात नाशिक शहरातील तिसरी घटना...
रोहित राजेंद्र नागरे असे मयत तरुणाचे नाव असून रोहितची हत्या झाली की त्याने आत्महत्या केली हे शवविच्छेदनंतर स्पस्ट होणार आहे. मात्र, अवघ्या चार दिवसात नाशिक शहरातील ही तिसरी घटना असल्याने नाशिक शहरात दहशतीचे वातावरण पसरले आहे. तर या वाढत्या घटनांना कठोर उपाययोजना करून पोलिसांनी नियंत्रणात आणावे, अशी मागणी आता जोर धरत आहे.