महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / city

नाशकात भरधाव वाहनाने चिरडल्यानं 5 वर्षाच्या मुलाचा मृत्यू - accident case in nashik

अपघातामध्ये मनपा कर्मचारी रोहित पवार आणि त्यांची पत्नी देखील गंभीर जखमी झाले असून त्यांच्यावर सध्या एका खासगी रुग्णालयात उपचार सुरू आहेत. दरम्यान याप्रकरणी सातपूर पोलीस ठाण्यात टेम्पो चालकाविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला.

5 year old boy dies after being crushed by a speeding vehicle in Nashik
नाशकात भरधाव वाहनाने चिरडल्यानं 5 वर्षाच्या मुलाचा मृत्यू

By

Published : Mar 13, 2021, 3:56 AM IST

नाशिक -सातपुर-अंबडलिंक रोड येथे बुधवार रात्री दुचाकी व ४०७ टेम्पो मध्ये झालेल्या अपघातात नाशिक मनपाचे कर्मचारी रोहित पवार यांचा ५ वर्षीय मुलगा प्रणय रोहित पवार हा बालक ठार झाला आहे. तर रोहित पवार व त्यांची पत्नी गंभीर जखमी झाली आहे.

मृत बालक मनपा कर्मचाऱ्याचा मुलगा-

सातपूर अंबड लिंक रोड वर रात्री दहा वाजेच्या सुमारास रोहित पवार आपल्या दुचाकी वाहनावरून पाटील पार्ककडे जात होते. दरम्यान दुचाकीला समोरून आलेल्या भरधाव वाहनाने जोरदार धडक दिली. यामध्ये एका पाच वर्षीय बालकाचा मृत्यू झाल्याची घटना घडली आहे. प्रणय पवार असे अपघातात मृत्यू झालेल्या मुलाचे नाव असून प्रणय हा नाशिक महापालिकेचे कर्मचारी रोहित पवार यांचा मुलगा होता.

संबंधितांवर कारवाई करण्याच्या मागणीसाठी नागरिकांचे रस्ता रोको-

काही दिवसांपासून सातपूर-अंबडलिंक रोडवर पाईपलाईन टाकण्याचे काम सुरू आहे. या ठिकाणचा रस्ता वळवण्यात आला आहे. मात्र या दरम्यान रस्त्यावर ठेकेदाराने कोणत्याही प्रकारचा सूचनाफलक न लावल्याने हा अपघात घडला असल्याचा आरोप करत नागरिकांनी संबंधित ठेकेदारावर गुन्हा दाखल करण्यात यावा तसेच अपघात ग्रस्त कुटुंबाला नुकसान भरपाई देण्यात यावी, यासाठी गुरुवारी अंंबडलिक रोड येथे अर्धातास रास्ता रोको आंदोलन करण्यात आले आहे.

टेम्पो चालकाविरुद्ध गुन्हा दाखल-

अपघातामध्ये मनपा कर्मचारी रोहित पवार आणि त्यांची पत्नी देखील गंभीर जखमी झाले असून त्यांच्यावर सध्या एका खासगी रुग्णालयात उपचार सुरू आहेत. दरम्यान याप्रकरणी सातपूर पोलीस ठाण्यात टेम्पो चालकाविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला. पुढील तपास पोलीस करत आहेत. मात्र या अपघातांमध्ये अवघ्या पाच वर्षीय प्रणयचा दुर्दैवी मृत्यू झाल्याने संपूर्ण सातपूर परिसरात हळहळ व्यक्त केली जात आहे.


हेही वाचा-चिंताजनक! राज्यात शुक्रवारी 15 हजार 817 नवे कोरोनाबाधित

ABOUT THE AUTHOR

...view details