नाशिक- गुजरात येथून अवैधरित्या गुटखा आणणाऱ्या तीन जणांना मालेगाव विशेष पोलीस पथकाने वणी येथून अटक केली. त्यांच्याकडून २ पिकअप मालवाहू जीपसह एकूण ४६ लाख २८ हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे.
नाशकातून गुटख्याची अवैध वाहतूक, तीन जणांसह ४६ लाखांचा मुद्देमाल जप्त - rakesh shinde
गुजरात येथून अवैधरित्या गुटखा आणणाऱ्या तीन जणांना मालेगाव विशेष पोलीस पथकाने वणी येथून अटक केली.
गुजरात मार्गे महाराष्ट्रात सापुतारा-वणी रोडवर दोन पिकअपमधून अवैधरित्या गुटखा येणार असल्याची माहिती मालेगाव पोलिसांना मिळाली. त्यानंतर मालेगाव पोलिसांच्या विशेष पथकाने वणी रोडवर सापळा लावून वाहनांची तपासणी सुरू केली.
यात दोन मालवाहू पिकअपमधून (क्र.एम एच ४१ ए जे २७१४ व एम एच ४१ ए जे २४९४) मोहनभाई प्रेमभाई महाले, राजुकृष्णा मोहन चतुर्वेदी, रोहित राजू जाधव (तीघे रा. गव्हाण, जि. हवाडाग, गुजरात) हे महाराष्ट्र शासनाने प्रतिबंधित केलेल्या गुटख्याची वाहतूक करताना त्यांना आढळून आले. पोलिसांनी विमल पान मसाला, विमल पान, तंबाखू आणि दोन पिकअप वाहने जप्त केली आहेत. या प्रकरणी मालेगाव पोलीस विशेष पथकाने वणी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल केला आहे.