नाशिक - शहर पोलिसांच्या 'भरोसा सेल'मध्ये मागील सहा महिन्यात पती-पत्नीच्या वादाचे तब्बल 375 अर्ज दाखल झाले आहे. यात मुख्य कारण विवाहबाह्य संबंध ठरत असून यामुळे अनेक कुटुंब उध्वस्त होण्याच्या मार्गावर असून पती पत्नीचं समुपदेशन करून
त्यांच्यात समेट घडवण्याचे काम नाशिकचे भरोसा सेल करत आहे.
धक्कादायक ! विवाहबाह्य संबंध ठरतायत कुटुंब उद्ध्वस्त होण्याचे मुख्य कारण; भरोसा सेलमध्ये सहा महिन्यांत 375 अर्ज - नाशिक कोरोना लॉकडाऊन अपडेट बातमी
लॉकडाऊन काळात आमच्याकडे 375 अर्ज दाखल झाली असून लॉकडाऊन काळात पती-पत्नीने बराच काळ एकत्र घालवल्याने अनेकांमधील वाद उफाळून आले आहेत. यात आर्थिक परिस्थिती, मानसिक त्रास सोबत विवाहबाह्य अनैतिक संबंधचे प्रमुख कारण दिसून येत आहे. अनेक महिलांनी वादाचे वेगवेगळे कारणे सांगितले आहेत. यात पती घरी कुटुंबाला वेळ देत नाही, रात्री उशिरा घरी येणे, पती-पत्नी मधील संवादाचा अभाव, आर्थिक टंचाई असे अनेक प्रश्नांवरून पती-पत्नीमध्ये वाद होत आहे.
विवाहबाह्य संबंध ठरतायत कुटुंब उद्ध्वस्त होण्याचे मुख्य कारण
पती पत्नीत विश्वास असणे महत्वाचे...
दोन वेगवेगळ्या कुटूंबातून पती, पत्नी एकत्र येत असतात. अशात प्रत्येकात चांगले तसेच वाईट गुण असतात आज कोणी ही परिपूर्ण नाही. त्यामुळे पती-पत्नीत संवाद असणे गरजेचे आहे. एकमेकांनी दोघांची काळजी घेणं महत्वाचे आहे. तसेच एकमेकांनवर विश्वास असला तर पती-पत्नीमधील वाद टाळता येऊ शकेल, असे मतं पोलीस निरीक्षक संगीता निकम यांनी व्यक्त केले.
Last Updated : Oct 13, 2020, 3:33 PM IST
TAGGED:
nashik police latest news