नाशिक - महाराष्ट्र पोलीस अकादमीत २२ प्रशिक्षणार्थी पाेलीस उपनिरीक्षकांना कोरोनाची बाधा झाल्याचे पुन्हा समाेर आले आहे. दिवाळीच्या सुटीत गावी गेलेल्या प्रशिक्षणार्थींची अकादमीमध्ये चाचणी करण्यात आली होती. त्यात हे कोरोनाबाधित असल्याचे आढळून आले आहेत. बाधितांवर महापालिकेच्या बिटको रुग्णालयात उपचार सुरु आहेत.
नाशिक : २२ प्रशिक्षणार्थी पीएसआय कोराेनाबाधित, दिवाळी सुटीहून परतलेल्यांचे अहवाल पाॅझिटिव्ह
महाराष्ट्र पोलीस अकादमीत २२ प्रशिक्षणार्थी पाेलीस उपनिरीक्षकांना कोरोनाची बाधा झाल्याचे पुन्हा समाेर आले आहे. दिवाळीच्या सुटीत गावी गेलेल्या प्रशिक्षणार्थींची अकादमीमध्ये चाचणी करण्यात आली होती. त्यात हे कोरोनाबाधित असल्याचे आढळून आले आहेत.
तीन दिवसांत तीन महिला प्रशिक्षणार्थींसह २२ जणांना बाधा -
राज्यातील पोलीस उपअधिक्षक व उपनिरीक्षक पदासाठी निवड झालेल्या राज्यभरातील उमेदवारांना महाराष्ट्र पोलीस अकादमीमध्ये प्रशिक्षण दिले जाते. दिवाळीनिमित्त प्रशिक्षणार्थींना सात दिवसांची सुटी देण्यात आली होती. त्यामुळे प्रशिक्षणार्थी गावी गेले होते. सुटी संपल्याने ते अकादमीमध्ये परतले. गावाहून परतलेल्या प्रशिक्षणार्थींची महापालिकेच्या सहकार्याने कोरोना चाचणी करण्यात आली. तीन दिवसांत तीन महिला प्रशिक्षणार्थींसह २२ जणांना बाधा झाल्याचे समोर आले आहे. महाराष्ट्र पोलीस अकादमीमध्ये ८८७ प्रशिक्षणार्थींची बॅच असून या सर्वांचे लसीकरण झाले आहे. बाधितांना त्रास जाणवत नसला तरी खबरदारी म्हणून त्यांना बिटकोमध्ये दाखल करण्यात आले आहे.