नाशिक - स्वत: डाॅक्टर नसतानाही पित्याने १४ महिन्यांच्या मुलीला व्हिटॅमीनचे इंजेक्शन देऊन उपचार केल्याने तिचा दुर्दैवी मृत्यू झाल्याची धक्कादायक घटना पंचवटीतील मखमलाबाद राेडजवळ घडली आहे. या प्रकरणी संशयित बापाविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
नाशिक : वडिलांनी दिलेल्या चुकीच्या इंजेक्शनमुळे मुलीचा झाला मृत्यू - etv bharat live
यापूर्वी जिल्हा रुग्णालयात काम केल्याने घरीच उपचार केल्याचे सांगत पित्याने आपल्या १४ महिन्यांच्या मुलीला व्हिटॅमीनचे इंजेक्शन देऊन उपचार केले. आणि त्याच तिचा मृत्यू झाला.
हेमंत यांनी मुदतीपूर्वीत घेतला होता डिस्चार्ज
घरी सलाईन व त्यात व्हिटामिनचे इंजेक्शन दिले.त्यातच रियाचा मृत्यू झाला. वैद्यकीय ज्ञान नसताना बापाने मुलीवर उपचार केल्याने तिचा मृत्यू झाल्याने संताप व्यक्त केला जात आहे. हेमंत भारत शेटे असे संशयित बापाचे नाव आहे. त्यांनी मुलगी रिया हिची तब्येत बिघडली असता काही दिवसांपासून तिच्यावर वैद्यकीय उपचार सुरु होते. काहीसे बरे वाटल्यावर हेमंत यांनी तिचा मुदतीपूर्वीत डिस्चार्ज घेतला. घरी आणल्यानंतर पून्हा तिची प्रकृती बिघडल्यानंतर तिचे वडील हेमंत यांनी गुरुवारी दुपारी एकला घरी सलाईन व त्यात व्हिटॅमिनचे इंजेक्शन दिले. त्यातच तिचा मृत्यू झाला. याबाबत रियाची आई अलका शेटे यांनी पती हेमंत यांच्याविराेधात फिर्याद दाखल केली आहे. त्यानुसार त्यांच्यावर मुलीच्या मृत्यूस कारणीभूत झाल्याचा गुन्हा नाेंद करण्यात आला आहे. मी यापूर्वी जिल्हा रुग्णालयात काम केल्याने घरीच उपचार केल्याचे पोलिसांनी सांगितले आहे. या प्रकरणी पुढील तपास पाेलीस उपनिरीक्षक पी. ए नेमाणे करत आहेत.
हेही वाचा -औरंगाबाद: पहिल्या मजल्यावरून फेकून जीवे मारण्याचा प्रयत्न; टोळक्याविरूध्द गुन्हा दाखल