महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / city

नाशकात गेल्या 24 तासांत कोरोनामुळे 14 जणांचा मृत्यू ; तर 124 नव्या रुग्णांची भर - नशिकमधील कोरोनाबाधितांचा आकडा

जिल्ह्यात गेल्या 24 तासांत 14 जणांचा कोरोनामुळे मृत्यू झाल्याने हळहळ व्यक्त होत आहे. मंगळवारी 124 नवे रुग्ण आढळून आले असून यात नाशिक शहरातील 78 रुग्णांचा समावेश आहे.

नाशिक कोरोना अपडेट
नाशिक कोरोना अपडेट

By

Published : Jun 24, 2020, 12:23 PM IST

नाशिक - जिल्ह्यात गेल्या 24 तासांत 14 जणांचा कोरोनामुळे मृत्यू झाल्याने हळहळ व्यक्त होत आहे. लॉकडाऊन शिथिल केल्यापासून मोठ्या प्रमाणात नागरिक घराबाहेर पडल्याने नाशिकमध्ये कोरोनाचा प्रादुर्भाव वाढला आहे. मंगळवारी जिल्ह्यात 124 नवे रुग्ण आढळून आले असून यात नाशिक शहरातील 78 रुग्णांचा समावेश आहे.

नाशिक जिल्ह्यात कोरोनाबाधितांची संख्या 2 हजार 998 वर पोहोचली आहे, तर मंगळवारी 313 नवीन संशयित रुग्ण आढळले आहे. यात नाशिक जिल्हा रुग्णालय 16, नाशिक महानगरपालिका रुग्णालय 176, वैद्यकीय महाविद्यालय 2, मालेगाव महानगरपालिका रुग्णालय 12, ग्रामीण रुग्णालय एचडीएचसीमधील 107 रुग्णांचा समावेश आहे.

महानगरपालिकेतील नगररचना विभागातील शिपायाला कोरोनाची लागण झाल्यानंतर आता महानगरपालिका आयुक्तांच्या स्वीय सहाय्यकाला कोरोनाचा संसर्ग झाल्याने खळबळ उडाली आहे. महानगरपालिकेतील अनेक अधिकारी त्याच्या संपर्कात आले असून पहिल्या टप्प्यात आयुक्त कार्यालयातील 19 कर्मचाऱ्यांचे नमुने तपासणीसाठी पाठवण्यात आले आहे.

ABOUT THE AUTHOR

...view details