चारित्र्याच्या संशयावरून पत्नी व एक वर्षाच्या मुलाचा खून - नांदेड
राजेश श्रीमंगले याने चारित्र्याच्या संयशावरुन पत्नी अलका व एक वर्षीय मुलगा रुपेश यांना अर्धापूर शिवारातील येथील एका शेतातील विहीरमध्ये ढकलून खून केला आहे.
मृत अलका श्रीमंगले
नांदेड- पत्नी व एक वर्षाच्या मुलाला विहिरीत फेकून देऊन खून केल्याची घटना रविवारी रात्री आठ वाजताच्या सुमारास अर्धापूर तालुक्यात घडली. घटेनीत आरोपी राजेश श्रीमंगले याने स्वतःच पोलीस ठाण्यात येऊन गुन्ह्याची कबुली देत अटक करून घेतली.