महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / city

नागपुरात पूर्व वैमनस्यातून तरुणाची हत्या; तडीपार आरोपीसह चौघांना अटक - पूर्व वैमनस्यातून तरुणाची हत्या नागपूर

सक्करदरा पोलीस ठाण्याच्या हद्दीत सोमवारी क्वाटर परिसरात चार आरोपींनी एका तरुणाचा निर्घृण खून केल्याची घटना घडली घडली आहे. गौरव खडतकर असे खून झालेल्या तरुणाचे नाव आहे.

Young man killed in Nagpur
पूर्व वैमनस्यातून तरुणाची हत्या नागपूर

By

Published : Jun 23, 2020, 5:17 PM IST

नागपूर - शहरातील सक्करदरा पोलीस ठाण्याच्या हद्दीत सोमवारी क्वाटर परिसरात चार आरोपींनी एका तरुणाचा निर्घृण खून केल्याची घटना घडली आहे. गौरव खडतकर असे खून झालेल्या तरुणाचे नाव आहे. गौरवचा खून केल्याप्रकरणी सक्करदारा पोलिसांनी चार आरोपींना अटक केली असून त्यामध्ये एका तडीपार आरोपीचा देखील समावेश आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, गौरव खडतकर सक्करदरा परिसरातील सोमवारी क्वाटर परिसरात राहतो. त्याच परिसरात आरोपी कार्तिक चौबे हा सुद्धा राहतो. या दोघांमध्ये जुना वाद असल्याची माहिती समोर आली आहे. काल (सोमवार) रात्री सोमवारी क्वाटर परिसरातील शाहू गार्डन परिसरात उशिरा गौरव खडतकर आणि आरोपी कार्तिकचा सामना झाला, तेव्हा जुना वाद पुन्हा उफाळून आला. त्यावेळी आरोपी कार्तिक चौबे आणि त्याच्या तीन सहकाऱ्यांनी गौरवची लाकडी राप्टर, दगड,फर्शी डोक्यावर मारून खून केला.

पोलीस निरीक्षक सत्यवान माने यांची प्रतिक्रिया...

हेही वाचा...लॉकडाऊन इफेक्ट; पगार कमी झालेल्या शिक्षिकेची सावकारी त्रासामुळेच आत्महत्या, सुसाईड नोटमधून उघड

या प्रकरणातील मुख्य आरोपी कार्तिक चौबे हा गुन्हेगारी स्वरूपाचा असून त्याच्यावर तडीपारीची कारवाई देखील करण्यात आली होती. गौरवच्या हत्येप्रकरणी पोलिसांक कार्तिक चौबे, शहबाज उर्फ बाबु मुस्तफा खान, राजा उर्फ साहील शेख बाबा आणि मृणाल गिरीष भापकर यांचा समावेश आहे. सर्वात महत्त्वाचे म्हणजे मुख्य आरोपी कार्तिक चौबे याला अटक करण्यासाठी गेलेल्या पोलीस कर्मचाऱ्याच्या अंगावर दुकाची नेल्याने पोलीस कर्मचारी जखमी झाले असल्याने आरोपींवर सरकारी कामात अडथळा निर्माण केल्याचा गुन्हा सुद्धा दाखल करण्यात आला आहे.

ABOUT THE AUTHOR

...view details